महाराष्ट्र
बांधकाम कर्मचाऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोडले टीकास्त्र
By Admin
बांधकाम कर्मचाऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोडले टीकास्त्र
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्य सरकारने गौण खनिजावर बंदी आणल्यामुळे बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निषेधार्थ संगमनेर येथे बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेल्या कामगारांनी प्रांताधिकारी कार्यालय हजारोच्या संख्येने आपणास मोर्चा येऊन धडकला.
संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स या ठिकाणावरून सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान महाआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली
यशोधन कार्यालय नाशिक रोड बस स्थानक मार्गे हा मोर्चा संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयावर येऊन धडकला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देऊन प्रांत अधिकारी कार्यालयाचा परिसर तणाव सोडला होता. या मोर्चामध्ये संगमनेर शहर आणि तालुक्यातील हजाराच्या संख्येने बांधकाम कामगार ठेकेदार स्टोन क्रेशर चालक असे अनेक बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेले महिला आणि नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चात काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी व ठेकेदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
वाळूचे धोरण नसल्याने वाळूसह खडी मिळणे अवघड झाले आहे. याच कारणामुळे बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या धोरणा विरोधात संगमनेर (sangmaner) शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.
माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आणि विद्यमान महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विखे यांनी महसूल विभागाची धुरा हातात घेतल्यानंतर महिनाभरापूर्वी संगमनेर तालुक्यातील अनेक दगडखाणींवर अनियमितता असल्याने तब्बल 765 कोटी रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर वाळूचे धोरण नसल्याने वाळूसह खडी मिळणे अवघड झाले आहे. याच कारणामुळे बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. संगमनेर तालुक्यातील बांधकामे ठप्प झाली असून त्यावर काम करणारे मजूर, ठेकेदार, इंजिनिअर यासह अनेक घटक अडचणीत सापडले आहेत. या विरोधात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यात मोठ्या प्रमाणावर महिलाही सहभागी झाल्या होत्या. तर वाळू व खडी मिळत नसल्याने निळवंडे धरणाच्या कालव्यांची सुद्धा कामे बंद असलाचे आंदोलकांनी सांगितलं आहे.
दरम्यान माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही फोनवरून भाषण करत या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आजारी असताना फोनवरून मोर्चाला संबोधित करतानामहसूलमंत्री विखे नाव न घेता यांच्यावर टीका केली आहे. तुमचा आक्रोश तुम्ही मांडताय, मात्र जे कोणी त्रास द्यायला निघाले आहेत. त्यांना सांगितलं पाहिजे, अशा प्रकारचा त्रास सहन केला जाणार नाही.. हे सगळं कठीण असेल, मात्र विजय आपलाच होईल हे लक्षात ठेवा. काही मंडळीच राजकरण हे दहशतीचे असून आतापर्यंत ते असच राजकारण ते करत आले आहेत आणि हीच दहशत जिल्ह्यात करणार असतील तर जिल्हा हे सहन करणार नाही असा इशारा थोरात यांनी दिला आहे. थोरात आणि विखे एका पक्षात असतांना सुद्धा त्यांच राजकीय वैर सुरूच होत.. आज तर दोघेही एकमेकांच्या विरोधी पक्षात असल्याने हा संघर्ष कोणत्या टोकाला जाणार हे आगामी काळाच ठरवेल हे मात्र नक्की..
मोर्चात चक्क गाढवांची एंट्री :
संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चामध्ये त्या कारवानी नदीपात्रातून वाळू वाहतूक केली जाते ते गाढवे सुद्धा या मोर्चात गाढवावरून वाळूची वाहतूक करणारे कर्मचारी घेऊन आल्याने सर्वजण अवाक झाले होते
Tags :
609704
10