वाळू तस्करांच्या आवळल्या मुसक्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महिना भरापासून शेवगाव पोलिसांनी वाळू तस्करांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. एक-एक तस्करांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत.
कारवाईचा एक भाग म्हणून शनिवारी (दि.14) शेवगावचे पोलिस निरिक्षक विलास पुजारी यांनी टीमसह वाळू तस्करांवर कारवाई केली. यामध्ये डंपरसह नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिस निरिक्षक पुजारी, पोलिस कर्मचारी शहाजी आंधळे, राहुल खेडकर, बप्पासाहेब धाकतोडे, सोमनाथ घुगे आदींची टीम शेवगाव पोलिस ठाण्याच हद्दीत गस्त घालताना माहिती मिळाली की, बोधेगाव – पाथर्डी रस्त्यावर वाळुने भरलेला एक डंपर वाळू चोरून घेऊन जात आहे. यावरून पोलिस निरीक्षक पुजारी यांनी आपल्या टीमला सोबत घेवून आधोडी फाटा (ता. शेवगाव) येथे चौकात सापळा लावला असता, सकाळी सहा वाजता एक पांढर्या रंगाचा डंपर (एम.एच.12 एचडी 8569) आल्याने त्यास बाजुला थाबण्यास सांगितले. चालक दीपक योसेफ गरुड (रा. इंदिरानगर, तिसगाव, ता. पाथर्डी) यास वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत पोलिसांनी विचारणा केली.
यावेळी त्याने कोणताही परवाना नसलेल्याचे सांगितले. त्याच्याकडे शासनाची कोणती परवानगी नव्हती. बेकायदेशीर वाळू चोरी करून तो वाळू वाहतूक करताना मिळून आला. यामुळे पोलिसांनी नऊ लाखाचा पांढर्या रंगाचा डंपर, 30 हजारांची तीन ब्रास वाळू डंपरमध्ये मिळून आल्याने हा डंपर जप्त करून शेवगाव पोलिस ठाण्यात लावला. चालकाविरोधात बप्पासाहेब धाकतोडे यांनी फिर्याद दिल्यानंतरगुन्हा दाखल करण्यात आला.