पाथर्डी- जिरेवाडी मंदिरातील दानपेटी लांबविली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील जिरेवाडी गावतील संत वामनभाऊ, भगवान बाबा व विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक मंदिराची दान पेटी व पेटीतील अंदाचे साठ हजार रूपये चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
मुकुंद महादेव आंधळे यांच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात संत वामनभाऊ, भगवान बाबा आणि विठ्ठल रुक्मिणी अशा एकत्रित सार्वजनिक मंदिराच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटी चोरी गेल्याची माहिती सोमवारी सकाळी 7 वाजता ग्रामस्थांच्या लक्षात आली.
दरवर्षी वामनभाऊंच्या पुण्यतिथीनंतर दुसर्या दिवशी सर्व ग्रामस्थांसमोर दानपेटी उघडली जाते. दरवर्षी दानपेटीत अंदाजे साठ हजार रुपये निघतात. रविवारी रात्री 8 वाजता नेहमी प्रमाणे आंधळे हे मंदिरात दर्शनाला गेले. त्यावेळी मंदिरात दानपेटी होती. त्यानंतर सोमवारी सकाळी मंदिरातून दानपेटी चोरीला गेल्याचे लक्षात आले.आतील रक्कम काढून घेऊन दानपेटी परिसरात टाकून दिल्याचे आढळून आले.