कारखान्याच्या गोदामावर वीज पडून आग लागल्याने मोठे नुकसान
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मुळा सहकारी कारखान्याच्या भुसा गोदामावर वीज पडल्याने आग लागली. आठ अग्निशामक बंब आग आटोक्यात आणण्यासाठी कार्यरत असून, अडीच तास उलटूनही मोठ्या ज्वाला व धूर निघतच आहे.
शनिवारी सायंकाळी पाच वाजता विजेचा मोठा कडकडाट झाल्याने परिसरातील नागरिकांत घबराट निर्माण झाली होती.
थोड्याच वेळात धुराचे लोट कारखाना परिसरात दिसल्याने काही क्षणात बघ्यांची मोठी गर्दी झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी शनैश्वर देवस्थान, राहुरी नगरपरिषद, ज्ञानेश्वर कारखाना, अशोकनगर कारखाना येथील अग्निशामक बंब आलेले असून, गंगामाई कारखाना व पाथर्डी परीषदेसह काही अग्निशामक पथक येण्यासाठी रवाना झालेली आहेत.
जवळपास पूर्ण भुश्याच्या गोदामाला आगीने पेट घेतला. रात्री सात वाजेपर्यंतही वारा सुटला असल्याने आग आटोक्यात आणता आली नाही. मुळा कारखान्याचे कर्मचार्यांसह अग्निशामक दलाचे पथक ही आग विझवण्यासाठी कार्यरत आहेत. रात्री उशिरापर्यंत आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.