महाराष्ट्र
79496
10
काळेगाव व साकेगाव मायनर चारी दुरुस्तीचे काम मार्गी लागणार
By Admin
काळेगाव व साकेगाव मायनर चारी दुरुस्तीचे काम मार्गी लागणार : सौ. काकडे
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील काळेगाव व साकेगाव मायनर चारी क्र.१ मध्ये गाळ व माती साचून ती उथळ झाल्यामुळे आवर्तन काळात चारीचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना - येणे-जाणे कठीण होते. तसेच सदरच्या चारीची मागील बऱ्याच वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने चारीच्या सेवापथावर मुरूम टाकणे, रस्त्यावर पूल करणे व चारीची दुरुस्ती करणे, याबाबत शेतकऱ्यांसमवेत मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सायली पाटील यांची समक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे - निवेदनाद्वारे मागणी केली होती. या मागणीला यश आले असून, मुळा पाटबंधारे विभागाने या कामाला हिरवा कंदील दाखवला असल्याचे प्रतिपादन मा. जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदा काकडे यांनी येथे केले.
काळेगाव येथील ग्रामस्थांची येथील हनुमान मंदिरामध्ये बैठक पार पडली, या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी ग्रा.पं. सदस्य अजय सातपुते, रविंद्र सातपुते, अशोक सातपुते, लहू तांबोरे, गहिनीनाथ सातपुते, भागचंद सातपुते, बाबासाहेब सातपुते, मनोज सातपुते, अंबादास सातपुते, रामदास तांबोरे, उद्धव सातपुते, नवनाथ तांबोरे, रावसाहेब तांबोरे, विष्णू हवालदार, प्रमोद सुसे, लक्ष्मण मोरे, गोरक्ष सातपुते,
अप्पासाहेब सातपुते, अशोक सातपुते, वसंत सातपुते, निवृत्ती गाडेकर, बाळासाहेब भोसले, हरिभाऊ भोसले, बबन पठारे, पप्पू सातपुते, निवृत्ती तांबोरे, मारुती तांबोरे, रंगनाथ तांबोरे, कल्पना सातपुते, लक्ष्मी सातपुते, मंगल सातपुते, शितल सातपुते, सुंदरबाई सातपुते, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. पुढे बोलताना सौ. काकडे म्हणाल्या की, तुम्ही सर्व एकत्र आले तर कोणतेही काम एकीच्या जोरावर
होत असते. आपण २५ जून रोजी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सायली पाटील यांची समक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला यश आले असून, मुळा पाटबंधारे विभागाने या कामाला हिरवा कंदील
लोकप्रतिनिधींकडे अनेकदा मागणी करूनही त्यांनी आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले; परंतु हाती कुठलेही पद नसताना सौ. हर्षदा काकडे यांनी प्रश्न मार्गी लावला, त्याबद्दल सौ. काकडे यांचे मनःपूर्वक धन्यवाद. : निवृत्ती तांबोरे, ज्येष्ठ नागरिक काळेगाव.
दाखवला आहे. त्याबाबतचे मुळा पाटबंधारे उपविभाग अमरापूरचे एस.व्ही. देशमुख यांनी तसे लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे लवकरच हे काम सुरु होणार असून, शेतकऱ्यांची रस्त्याअभावी होणारी हेळसांड दूर होणार आहे.
Tags :

