चार दुचाकी गाडी चोरणारे पकडले गाड्या पोलिसांच्या ताब्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात विविध भागांमधून दुचाकी चाेरी करणाऱ्या चाैघांना काेतवाली पाेलिसांनी अटक केली. या चाैघांकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पाेलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी घेतली.
शुभम बबन भापकर (वय २१, रा. गुंडेगाव, ता. नगर), कृष्णा बाबासाहेब गुंड (वय २५, रा. मेहेरबाबा वेशीजवळ, अरणगांव, ता. नगर), अभिषेक संतोष खाकाळ (वय २०, रा. संभाजीनगर, व्हीआरडीई गेट, अरणगांव, ता. नगर) व जालिंदर अर्जुन आमले (वय २१, रा. आमले मळा, अरणगांव, ता. नगर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. मोमीन तस्दीक मोमीन इद्रीस (वय १९, रा. जिल्हा परिषद शाळेजवळ, मुकुंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत अटक करण्यात आली आहे. या चाैघांकडून ५५ हजार रुपयांच्या चार मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. पाेलिस नाई सलीम शेख तपास करीत आहे.