महाराष्ट्र
Breaking- मा.शिवाजी कर्डिले यांना धक्का भाजपचे तालुकाध्यक्ष यांचा समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
By Admin
Breaking- मा.शिवाजी कर्डिले यांना धक्का भाजपचे तालुकाध्यक्ष यांचा समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शिवाजी कर्डिले यांचे समर्थक समजले जाणारे भाजपचे राहुरी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी समर्थकांसह आज प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राहुरीतील भाजपचे आणखीही काही नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ( ED's tension not taken up by Tanpur: Shock to Kardile )
अहमदनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्या व राहुरी नगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. राज्याचे ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईला सामोरे जावे लागत असताना त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांना मोठा धक्का दिला आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्या प्रसाद शुगर साखर कारखान्यावर ईडीने चार दिवसांपूर्वी कारवाई केली. या कारवाईनंतरही तनपुरे हे डगमगलेले दिसत नाहीत. त्यांनी शिवाजी कर्डिले यांचे कट्टर समर्थक अमोल भनगडे यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यात भाजपला मोठे खिंडार पडले आहे. या पक्षप्रवेशाने आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस बळकट झाली आहे.
मुंबई येथे आज (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत भाजपा तालुकाध्यक्ष भनगडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश सोहळा झाला. यावेळी भनगडे यांच्यासमवेत गणेगाव सोसायटीचे अध्यक्ष बापूराव कोबरणे, गणेगांवचे उपसरपंच पोपट कोबरणे, माजी उपसरपंच गंगाधर कोबरणे, बाळासाहेब कोबरणे, सोसायटी सदस्य बबन कोबरणे, भाऊसाहेब कोबरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुक्यातील कार्यकर्ते सुयोग नालकर, अनिल घाडगे, बापू जगताप, किरण कोळसे, किरण गव्हाणे, गंगाधर हारदे, पप्पू माळवदे उपस्थित होते.
मुंबई येथे आज प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्या भाजप कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लवकरच गणेगाव येथे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत भाजपत असलेले ग्रामपंचायत व सोसायटीचे सर्व सदस्य व हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळा होईल.
- अमोल भनगडे, राहुरी तालुकाध्यक्ष, भाजप.
Tags :
1422
10