महाराष्ट्र
पाथर्डी- परमेश्वर टकले यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर
By Admin
पाथर्डी- परमेश्वर टकले यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर
पाथर्डी प्रतिनिधी:
शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष परमेश्वर टकले यांच्या वाढदिवसानिमित्त निवडुंगे येथे घेतलेल्या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.परमेश्वर टकले मित्र मंडळ व जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
या शिबिराला पंचायत समिती चे सभापती गोकुळ भाऊ दौंड, मढी देवस्थान चे अध्यक्ष सरपंच संजय मरकड, निवडूंगे सरपंच विठ्ठल कोलते, माजी सरपंच आसाराम ससे, माणिक सावंत ,उपसरपंच आप्पासाहेब मरकड ,हात्राळचे माजी सरपंच हरिभाऊ शिवनकर ,निवडुंगा चे युवा नेते एकनाथ घोडके ,पाडळी ते युवा नेते प्रकाश कचरे, निवडुंगाचे ग्रामसेवक पातकळ भाऊसाहेब, पोपट मडके आदी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
तसेच या रक्तदान शिबिरास रक्तदात्यामध्ये विश्वविनायक पतसंस्थेचे मॅनेजर हरिदास पठाडे, शिरसाठ, ज्योती क्रांती पतसंस्थेचे मॅनेजर सचिन देवडे, विकास विजय भोसले ,कॅशियर प्रशांत तुपे ,संत एकनाथ पतसंस्थेचे मॅनेजर अनिल फुदे ,शिवसंग्राम युवक अध्यक्ष भारत भोईटे आदि ने रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. कोविड-१९ च्या काळात हे रक्तदान नक्कीच रुग्णासाठी फायद्याचे आहे ,असे मत निवडूंगे व परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले. यावेळी परमेश्वर टकले यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, वाढदिवसानिमित्त इतर खर्च करण्यापेक्षा रक्तदाना सारखे समाज उपयोगी उपक्रम करून आपण एक सामाजिक चळवळ उभी करत आहोत ,त्याची ही सुरुवात आहे. रक्तदान बरोबरच यापुढे अनेक शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत व निवडुंगे, मढी, हात्राळ, सैदापूर, माळी बाभुळगाव,धामणगाव , केळवंडी, शिरापूर या प्रत्येक गावांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे .त्यामध्ये रक्तदान शिबिर, शुगर तपासणी ,डोळे तपासणी असे अनेक उपक्रम शिवसंग्राम पाथर्डी व परमेश्वर टकले मित्र मंडळाच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती टकले यांनी दिली.
या शिबिरात ,योगेश कोलते, गणेश वाघमोडे, दत्ता काळे ,प्रवीण केदार, संकेत मरकड, सचिन कासार, भारत भोईटे, अजय भोसले, विशाल भोईटे, श्रीकांत टकले, चंद्रकांत देशमुख ,निवडुंगाचे डॉ. कोतकर आदींनी रक्तदान केले. या रक्तदानास जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांनी सहकार्य केले व यापुढे करण्याचे आश्वासन दिले.
शेवटी आभार युवा नेते एकनाथ घोडके यांनी मानले.
Tags :
296
10