महाराष्ट्र
66
10
राष्ट्रीय सेवा योजना शिबिर विद्यार्थ्यां मध्ये सामाजिक जाणिवा निर्माण करणारे केंद्र मा. श्री उद्धवराव वाघ
By Admin
राष्ट्रीय सेवा योजना शिबिर विद्यार्थ्यां मध्ये सामाजिक जाणिवा निर्माण करणारे केंद्र - मा. श्री. उद्धवराव वाघ
पाथर्डी- प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि दादापाटील राजळे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आदिनाथनगर ता-पाथर्डी जि-अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे उद्घाटन बुधवार दि 23/02/2022 रोजी मा. श्री उद्धवराव वाघ विश्वस्त,श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्था यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जीवन चांगले करायचे असेल तर कर्म चांगले करा असा उपदेश केला व हे चांगले कर्म करण्याचा योग या शिबिराद्वारे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आला आहे.
या प्रसंगी डॉ. कांडेकर ,वैद्यकीय अधिकारी कासार पिंपळगाव यांनी मनोगत व्यक्त केले व शिबिरात काम करताना विद्यार्थी स्वच्छता दूत असतात. प्लास्टिक कचऱ्याचे नियोजन कसे करावे त्याबद्दल विद्यार्थ्यांना त्यांनी माहिती दिली.
त्याचबरोबर डॉ. यशवंतराव गवळी विश्वस्त, श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्था, मा. श्री. वसंतरावजी भगत, मा. सौ. आशाताई तिजोरे, ह. भ. प. भाऊसाहेब पाटील राजळे, मा. श्री. संभाजी राजळे, मा. श्री प्रमोद म्हस्के ग्रामसेवक कासार पिंपळगाव,पोलिस पाटील मा. श्री. आप्पासाहेब एकनाथ राजळे, मा.श्री संभाजी नाना राजळे मा. श्री. विक्रमराव राजळे यानी शिबिरास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. रामदास म्हस्के उपाध्यक्ष, श्री शिवाजी विद्या विकास प्रतिष्ठान यांनी भूषविले. या वेळी त्यांनी प्रामाणिक कष्ट करणारा जीवनात यशस्वी होतो असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यानी केले. यावेळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रथम कॅम्प कासार पिंपळगाव मध्ये झाल्याच्या आठवणींना उजाळा दिला.
या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे विश्वस्त व मार्गदर्शक मा.राहुल राजळे,कासारपिपंळगाव च्या सरपंच मा. सौ. मोनालीताई राहुल राजळे यांचे अनमोल सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.आसाराम देसाई यांनी मानले त्याना हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. साधना म्हस्के, प्रा. अस्लम शेख, डॉ नितीन भिसे , प्रा. योगिता इंगळे यानी सहकार्य केले.
या प्रसंगी वरीष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ही या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थीत होते.
Tags :
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)