पाथर्डी- 'या' गावचा पिण्याच्या पाण्याच्या सुटणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील एक मोठी व्यापारी असलेल्या तिसगाव शहराला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांनी मार्गी लावण्यासाठी राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला लवरच यश येणार आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत तिसगावसाठी टाकण्यात येणाऱ्या स्वतंत्र पाइपलाइनचा आराखडा तयार करण्यात आला असून, या पाइपलाइनचा सर्व्हेदेखील जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केला आहे. निधी मंजूर होताच पाइपलाइनच्या कामाला सुरुवात होईल, असा विश्वास तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे केली.