पाथर्डी- 'या' महाविद्यालयातील १५ ते १८ वयोगटातील २४३ विद्यार्थ्यांचे लसिकरण
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयात ८ फेब्रुवारी रोजी १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
कोविड-१९ विषाणु प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम अंतर्गत १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची मोहीम केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सोमवार दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयात सुमारे २४३ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना कोवॅक्सिन व कोव्हीशील्ड चा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. सकाळी १२ वाजता लसीकरणास प्रारंभ होऊन ३ वाजेपर्यंत २४३ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.
या लसीकरणासाठी वॅक्सिन आँन व्हिल्स जीविका हेल्थकेअर कंपनीचे प्रमुख निलेश बनसोडे, डॉ. सोनल नांगरे, नीलम तुजारे, स्वाती डाके, विकास गायकवाड, विनोद सोनुने, वैशाली शेळके, सुनिता राजळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर, ज्युनियर कॉलेज प्रमुख गरड एस.एस.,विज्ञान विभाग प्रमुख काळे ए. एन. , डॉ. बबनराव टिळेकर तसेच इतर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.