नऊ हजार बायोडिझेल जप्त; पाथर्डी तालुक्यातील एका व्यक्तीसह चौंघाविरुद्ध गुन्हा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
साकत (ता. नगर) येथे अवैधरित्या बायोडिझेलची विक्री सुरू असताना पुरवठा विभागाने छापा घातला. या कारवाईत सोळा लाख 82 हजार रूपयांचे बायोडिझेल, टँकर व ट्रक असा 16 लाख 82 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चौघांविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद मोहन ठुबे (रा. केडगाव, नगर), विकास बाळासाहेब रोमन (रा. लोहसर खाडगाव ता. पाथर्डी), दत्ता सुखदेव भालके (रा. लोंढेमळा, केडगाव), बालसुब्रमण्यम आरूमुगन (रा. तमिळनाडू) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. पुरवठा निरीक्षक वैशाली शिकारे यांनी फिर्याद दिली आहे. साकत शिवारात अवैधरित्या बायोडिझेलची विक्री होत असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, पुरवठा निरीक्षक राजेंद्र राऊत, वैशाली शिकारे, अभिजित वांढेकर, महादेव कुंभार यांच्या पथकाने साकत शिवारात पंजाब नॅशनल ढाब्याशेजारी छापा घातला. त्यावेळी बायोडिझेलची विक्री होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पथकाने टँकर, ट्रकसह बायोडिझेल असा साठा जप्त केला असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.