धूम स्टाईलने सव्वा तीन तोळ्याचे गंठण केले लंपास
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
खरेदी करण्यासाठी लोणीत थांबलेल्या शोभा राहाने या महिलेच्या गळ्यातील सुमारे दिड लाख रूपये किंमतीचे सव्वा तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागीने मोटारसायकल वर आलेल्या दोन भामट्यांनी धूम स्टाईलने ओरबडून धुम ठोकली. ही घटना काल दिनांक 5 फेब्रुवारी रोजी भरदिवसा लोणीत घडली.
शोभा बाळासाहेब राहाने रा.चंदनापुरी, संगमनेर तसेच त्यांच्या सोबत आणखी एक महिला व दोन पुरुष हे काल दिनांक 5 फेब्रुवारी रोजी राहाता येथे लग्नासाठी जात असताना सायंकाळी चार वाजे दरम्यान लोणी येथे खरेदी करण्यासाठी थांबल्या होत्या. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर खरेदी करत असताना पाठीमागून मोटारसायकल वर दोन अज्ञात भामटे आले. यावेळी त्यांनी शोभा राहाने यांच्या गळ्यातील सव्वा तीन तोळे वजनाचे गंठण सुमारे दिड लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने ओरबडले. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केली. मात्र काही क्षणात सदर दोन्ही भामटे आलेल्या मार्गाने सुवाट वेगात निघून गेले.
यावेळी परिसरातील स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटिल, संपत जायभाय तसेच त्यांचे सहकारी यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले. पोलिस पथकाकडून आरोपींचा शोध घेण्यात आला. मात्र आरोपी मिळाले नाहीत.
या घटने बाबत काल उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.