महाराष्ट्र
1144
10
भ्रष्टाचाराचे आरोप सहन करणार नाही.- खा.सुजय विखे
By Admin
भ्रष्टाचाराचे आरोप सहन करणार नाही.- खा.सुजय विखे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
तनपुरे सहकारी कारखाना सक्षमपणे चालविला. एक पैशाचाही भ्रष्टाचाराचा आरोप सहन करणार नाही. जो न्याय राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी बाजार समितीला दिला, तोच न्याय तनपुरे कारखान्यासाठी मिळावा. मुदतवाढ मिळाली तरच कारखाना सुरू करणे शक्य होईल,’ असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी कारखाना कार्यस्थळी सुरू केलेले आंदोलन पाहता विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी संचालक मंडळासह कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यात यश आले नाही. त्यानंतर विखे व कर्डिले यांनी राहुरी येथे मेळावा घेतला. विखे म्हणाले, ‘दिवंगत खासदार बाळासाहेब विखे यांच्या आशिर्वादाने राजकारणामध्ये सहकार जपण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. राहुरीकरांची विखे कुटुंबियांसाठी नाळ जुडलेली आहे. त्यामुळे तनपुरे कारखान्यासाठी स्वतःच्या कुटुंबीयांची परवा केली नाही. रात्रंदिवस तनपुरे कारखाना सुरू रहावा, म्हणून प्रयत्नशील राहिलो. नर्सिंग होम, शिक्षण संस्थेत काम करणाऱ्यांचे थकीत पगार अदा करून त्यांना न्याय दिला. मागील काळातील १२ कोटी रूपयांची थकीत रक्कम अदा केली. ज्यांनी एक टन ऊस कारखान्याला दिला नाही, ते लोक आंदोलनस्थळी येऊन आमच्यावर टीका करीत आहे. मागील संचालक मंडळाच्या काळातील ८३ कोटी रूपये थकीत आहे. त्याबद्दल न्यायालयाचे कारण पुढे करून कामगार आमच्या कडील पाच वर्षाचा हिशोब मागत आहे. कामगारांची ही भूमिका समजेनासे झाली आहे. कामगारांनी सहकार्य केले, तरच आम्हाला कारखान्याचा गळीत हंगामासाठी प्रयत्न करता येईल. त्यामुळे कामगारांनी आंदोलनातून माघार घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. कामगारांनी सहकार्य करावे हिच भावना आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास गळीत हंगामाची तयारी करू. अन्यथा आम्ही आमचा योग्य निर्णय सर्वांपुढे जाहीर करू,’ असेही विखेंनी स्पष्ट केले.
Tags :

