पाथर्डी- महाराष्ट्र क्रिकेट संघात माळी बाभुळगावची कु. अंबिका वाटाडे ची निवड
पाथर्डी प्रतिनिधी
एस.व्ही.नेट क्रिकेट अकॅडमी पाथर्डीची खेळाडु कु.अंबिका वाटाडे हिची महाराष्ट्र राज्याच्या क्रिकेट संघात चौथ्यांदा निवड झाली आहे.
बि.सी.सी.आय मार्फत दर वर्षी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी नुकतीच २०२१ मध्ये धुळे येथे महाराष्ट्र राज्याच्या महिला अंडर १९ संघाची निवड झाली.या निवडीसाठी राज्यातुन २९० महिलांनी सहभाग घेतला होता, त्या मध्ये अहमदनगर जिल्ह्यातून अंबिका वाटाडे हिची चौथ्यांदा महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली.
अंबिका वाटाडे २०१८ ते २०२१ मध्ये राज्याच्या संघात प्रतिनिधीत्व करत आहे. ती एक उत्कृष्ट विकेट किपर व सलामीची फलंदाज आहे. अतिशय गरिब कुटुंबातील ही मुलगी पाथर्डी पासुन ५ किलो मीटर माळी बाभुळगाव येथुन सकाळी ६ ते १० व दु. ३ ते ६ पाथर्डी येथे सायकल वर येते. अंबिकाची आई शेतात रोजंदारीवर मजुरीचे काम करते. वडील चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत. खुप बिकट परिस्थितीतून क्रिकट खेळणारी अंबीकाला एस. व्ही. नेट चे संचालक श्री शशिकांत निऱ्हाळी गेल्या ८ वर्षा पासुन मोफत प्रशिक्षण देतात. कुठल्याही सुविधा नसतांना या अकॅडमीच्या चार मुली आत्तापर्यन्त राष्ट्रीय संघात(MCA) पाच मुली स्कूल नॅशनल, दोन मुली विघापीठ व दोन मुली ऑल इंडीयात खेळल्या आहेत. अंबिका वाटाडे ही २० सप्टेंबर २०२१ ला होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी गुजरात येथे जाणार आहे.पाथर्डी तालूक्यातुन तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
एकलव्य शिक्षण संस्थेचे सचिव प्रतापकाका ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. व्ही. नेट क्रिकेट ॲकॅडमी यशाचे शिखर चढत आहे. अंबिका वाटाडे हीस पुढील वाटचालीस प्रशिक्षकांनी व खेळाडूंनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.