पाथर्डी- शेवगाव तालुक्यातील १०० पूरग्रस्त कुटुंबांना किराणाचे वाटप
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी- शेवगाव तालुक्यातील १०० पूरग्रस्त नागरिकांना भाजपा युवा मोर्चाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे यांनी लोकवर्गणीतून किराणामालाची मदत केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, पाथर्डी येथील भाजपा युवा मोर्चाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे यांनी पाथर्डी- शेवगाव तालुक्यातील पूरग्रस्त असणाऱ्या कुटुंबांना धीर देत सामाजिक भावनेतून एक महिना पुरेल असे किराणा साहित्याची मदत केली आहे. अमोल गर्जे यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ५३ हजार रुपये जमा झाले व स्वतः काही योगदान देऊन ही किराणा मालाची मदत पूरग्रस्त कुटुंबांना करण्यात आली आहे.
यावेळी गर्जे म्हणाले, 'पाथर्डी- शेवगाव तालुक्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास आम्ही असेच पुढील काळात एकत्रित येऊन संकटाचा सामना करून आपत्कालीन कुटुंबांना असेच यथोचित मदत करू.'
पूरग्रस्तांना मदत देतांना जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, अकोला सरपंच संभाजी गर्जे,उपसरपंच अर्जुन धायतडक,नारायण पालवे,बाळासाहेब गर्जे,कृष्णा धायतडक,बालाजी गर्जे,बशीर भाई शेख,किरण पुरी,वैभव खेडकर,शुभम नहार,अशोक गोरे,घुगरे सर,अविनाश खंडागळे,रावसाहेब देवढे,निलेश जोशी,भागिनाथ देवढे, सुधाकर वाकचौरे,बंडू उबाळे,गहिनीनाथ काटे, सचिन खंडागळे,सुरेश फुंदे,रमाकांत फुंदे,दगडु धनवडे,संजय भागवत,जगन्नाथ कुसळकर, सुरेश फुंदे, विष्णु नाना देशमुख,उपसरपंच वसंत घुगरे, कल्याण काकडे,दत्तात्रय घुगरे, शिवाजी हाडोळे ,गोटीराम मुखेकर, पांडुरंग देशमुख,अशोक गोरे आदींची उपस्थिती होती.