आरोग्य मंञी राजेशजी टोपे यांची आ.मोनिका राजळे यांनी घेतली भेट
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव पाथर्डीच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांनी शेवगाव-पाथर्डीच्या तालुक्यांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके लक्षात घेता काल मुंबई येथे माननीय नामदार राजेशजी टोपे साहेब - मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांची भेट घेतली.
या भेटी दरम्यान तालुक्यातील आरोग्य विषयावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे नवीन 50 बेड वाढवून या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे तसेच ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे नवीन 50 बेड मंजूर करणे याच बरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र तिसगाव चे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणे या कामासंदर्भात मंत्रीमहोदयां बरोबर चर्चा करून पत्र दिले .
यावेळी शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील रुग्णालयात आरोग्यविषयक भौतिक सुविधा उपलब्ध करणे तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर व्हेंटिलेशन ऑक्सीजन प्लांट तसेच वैद्यकीय स्टाफ वाढविण्या संदर्भात मागणी करण्यात आली व या कामासंदर्भात मंत्रीमहोदयांनी संबंधितांना सूचना केल्या.