सरकारने मराठा आरक्षणाचा त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा राज्यात बोलके मोर्चे काढणार - डॉ कृषिराज टकले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून पडलेला आहे कोपर्डी घटनेनंतर राज्यात 58 मराठा मूक मोर्चे निघाले मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही केंद्र आणि राज्य शासनाच्या राजकारणात मराठा समाजाचे चेष्टा सुरू आहे सरकारने मराठा आरक्षण त्वरित जाहीर करावे अन्यथा मराठा मूक मोर्चाचे रूपांतर असा इशारा स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ,कृषिराज टकले यांनी दिला
नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारी येथे स्वाभिमानी मराठा महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी डॉ कृषिराज टकले बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा तालुक्याचे मा,आ ,बाळासाहेब मुरकुटे होते
याप्रसंगी स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे, निरीक्षक व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अंकुश डांभे, ह भ प चंद्रकांत महाराज लबडे आदींची भाषणे झाली याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की मराठा आरक्षणासाठी स्वाभिमानी मराठा महासंघ प्रयत्न करत आहे संघटनेच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असे आव्हान मुरकुटे यांनी केले
डॉ,कृषिराज टकले पुढे म्हणाले की लोकसभेमध्ये मराठा आरक्षणावर विधेयक मंजूर होत असताना मराठा समाजाचे खासदार गप्प का होते आणि विधानसभेमध्ये मराठा समाजाचे अनेक आमदार असताना मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही मराठा समाजाचा वापर मतांपुरताच का ? मराठा समाजाचा अंत राजकीय पक्षांनी पाहू नये अन्यथा येणाऱ्या निवडणुकांमध्ये मराठा समाज आपली ताकद दाखवून देईल
याप्रसंगी स्वाभिमानी मराठा महासंघाच्या प्रभारी राज्य उपाध्यक्षपदी अर्जुन लिपणे यांची नियुक्ती करण्यात आली
या कार्यक्रमास शेवगाव तालुका अध्यक्ष अनिल सुपेकर ,नेवासा तालुका अध्यक्ष सुदाम थोरे ,संभाजी नगर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब गिधाने, पैठण तालुका कार्याध्यक्ष नितीन दुबिले ,दादासाहेब चेडे, रावसाहेब गणगे, आदींसह शिकारी नांदूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते