या वर्षी कमी पाऊस, स्कायमेटचा अंदाज
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
देशाला पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यंदा देशात सामान्यपेक्षाही कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामानाचा अंदाज देणारी खासगी कंपनी स्कायमेटने म्हटले आहे. स्कायमेटने यापूर्वी १३ एप्रिलला मान्सूनपूर्व अंदाज वर्तवला होता. त्यावेळी देशात सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला होता. पण आता अपडेट अंदाज वर्तवला आहे. यानुसार देशात यंदा सामान्यपेक्षा ६० टक्के कमी पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने दिला आहे.
भौगोलिक स्थितीनुसार गुजरात, राजस्थान, ओडिशा, केरळ आणि ईशान्य भारतात यापुढे पाऊस कमी पडेल, असा अंदाज आहे. गुजरात आणि राजस्थानच्या पश्चिम भागात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात अनेक भागांमध्ये सामान्यपेक्षाही अधिक पाऊस पडला आहे. अनेक राज्यांत पाऊस अजूनही कमी पडत असल्याने पिकांचे नुकसान हाेण्याची शक्यता आहे.