महाराष्ट्र
4256
10
हनीट्रॅप प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती उघड
By Admin
हनीट्रॅप प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती उघड
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 22 मे 2021, शनिवार
अहमदनगर जिल्ह्यातील हनीट्रॅप प्रकारणात एक धक्कादायक माहीती उघडकीस आली आहे.आणखी अजुन काही घटना तपासात समोर येत आहेत.
नुकतेच एक हनीट्रॅप प्रकरण नगरमध्ये उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. ‘त्या’ बागायतदाराला प्रेमपाशात अडकवून तसला व्हिडिओ काढणार्या तरूणीच्या गँगचा पर्दाफाश पोलिसांनी केला. या प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला आरोपी बापू बन्सी सोनवणे याला न्यायालयाने 24 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण रस्त्यावरील जखणगाव येथील महिलेचे हनीट्रॅप चालविणारे संदीप खेसे आणि बापू सोनवणे हे सख्खे मेहुणे आहेत.
या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. बापू सोनवणे याची सख्खी बहिण संदीप खेसे याला दिली आहे. सख्खे मेहुणे असतानाही या दोघांनीही या महिलेसोबत शय्यासोबत केली आणि शेवटी या महिलेचा वापर करीत हनीट्रॅप चालविल्याचे आता उघड झाले आहे.
सोनवणे हा हायप्रोफाईल लोकांची नावे संबंधित महिलेला सूचवित होता. त्यानुसार सदर महिला संबंधितांना जाळ्यात ओढत होती. या हनीट्रॅप प्रकरणात ज्या महिलेला अटक केली आहे तिच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची माहिती आता पुढे येत आहे.
पोलिस आता या गुन्ह्यासह तीन कोटी रुपयांच्या गुन्ह्यांमध्ये कोण कोण सामील आहे, याचा शोध घेत आहेत.
काय आहे हे प्रकरण? कसे आले उघडकीस ? – नगरमध्ये नुकतेच प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ‘त्या’ प्रसंगाचा व्हिडिओ शूट करून एक बागायतदारावर हनी ट्रॅप रचला असल्याची घटना उघडकीस आली होती. बागायतदाराने हिम्मत दाखवत या गोष्टींचा उलगडा केला होता.
पोलिसांत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करून 1 कोटी रुपयांची मागणीही त्या कडे केली गेली. परंतु संबंधित बागायतदाराने पोलिसात धाव घेतली अन याचा पर्दाफाश झाला.
संबंधित महिला व नगर शहरातील कायनेटिक चौकातील किराणा दुकानदार अशा दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर यातील धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले गेले.
Tags :

