जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट, संगमनेर-220, अकोले - 155
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी, 23 मे 2021 रविवार
जिल्ह्यात कडक लाॕकडाऊन केल्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्णसंख्येचे मागील 24 तासात कमी प्रमाण आढळून आले आहे. आज
जिल्ह्यात मोठा दिलासा मिळाला असून कोरोना रुग्णसंख्या 2 हजाराच्या खाली आली आहे.कोरोनाचे प्रमाणात घट झाल्याचे दिसुन येत आहे.मनपा हद्दित फक्त 132 नविन रुग्णांची भर पडली आहे.जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 1851 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत.
24 तासात जिल्ह्यात आढळलेली रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे
संगमनेर - 220
अकोले - 155
राहुरी - 111
श्रीरामपूर - 90
नगर शहर मनपा - 132
पारनेर - 181
पाथर्डी - 127
नगर ग्रामीण - 173
नेवासा - 111
कर्जत - 85
राहाता - 91
श्रीगोंदा - 142
कोपरगाव - 122
शेवगाव - 43
जामखेड - 35
भिंगार छावणी मंडळ - 11
इतर जिल्हा - 21
मिलिटरी हाॕस्पिटल - 01
इतर राज्य - 0
जिल्हा रुग्णालयाच्या लॕबमध्ये 370 , खाजगी प्रयोग शाळेत 493 तर अॕटीजन चाचणीत एकूण 988 रुग्ण पाॕझिटिव्ह आढळून आले आहे.