प्रेम प्रकरणातून मित्रानेच केला गोळीबार,भेंडे येथे घडला प्रकार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 06 मे 2021
प्रेम प्रकारनातून हा प्रकार घडला असून यार ,दोस्तच घातक ठरला असून गोळीबार करणाराही मिञच होता.
तालुक्यातील भेंडे येथील गोळीबार नाजूक प्रकरणातून, फिर्यादी जखमी तांबेच्या मित्रांनीच घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलिसांनी चोवीस तासांत गावठी पिस्तुलासह दहा जणांना पकडले. यातील आरोपी मित्रांना वाचविण्यासाठी फिर्यादीच्याच मित्रांनी बनाव करून, पूर्ववैमनस्य असलेल्या दोघांना या प्रकरणात अडकविण्याचा बनावही उघड झाला. नेवासे न्यायालयाने सर्वांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (The attack was made by a friend out of love affair)
शुभम विश्वनाथ गर्जे (रा. वडुले, ता. नेवासे), स्वप्नील बाबासाहेब बोधक (रा. भेंडे बुद्रुक, लांडेवाडी, ता. नेवासे), अमोल राजेंद्र शेजवळ, अमोल अशोक गडाख (दोघे रा.
सोनई, ता. नेवासे), अक्षय रामदास चेमटे (रा. घोडेगाव, ता. नेवासे) यांनी खुनाचा प्रयत्न केला म्हणून, तर ओंकार राजेंद्र काकडे, प्रसाद शिवाजी दळवी, अक्षय संजय आपशेट यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी व राहण्यास मदत केल्याने, शुभम किशोर जोशी (रा. शहरटाकळी, ता. शेवगाव) याला गावठी पिस्तुलासह अटक केली.
फिर्यादी सोमनाथ तांबे याचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. त्याला अक्षयचा विरोध होता. त्यातूनच अक्षयने तांबेवर गोळी झाडली. मात्र, अक्षय चेमटे व अमोल शेजवळ या मित्रांना या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी शुभम गर्जे व स्वप्नील बोधक यांनी जखमी तांबेवर दबाव आणून, पूर्ववैमनस्य असलेल्या कुकाणे येथील पप्पू जावळे व गणेश पुंड यांचे नाव नेवासे पोलिसांसमोर संशयित आरोपी म्हणून घेतले. हा बनावही पोलिस तपासात उघड झाला.