ई- पास नसताना एका अधिकाऱ्यांने पोलीसाबरोबर घातली हुज्जत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 21 मे 2021,शुक्रवार
प्रवासादरम्यान ई-पास जवळ नसताना दंडात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकार्यांसह कर्मचार्यांना एका अधिकार्यानेच दमदाटी केल्याचा प्रकार पोलीस अधीक्षक चौकात घडला. या प्रकरणी दोघांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
गजानन निवृत्ती पडघन, प्रगत गजानन पडघन (रा. खडकी जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नावे आहेत. भिंगार कॅम्पचे सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार सहायक निरीक्षक देशमुख पथकासह पोलीस अधीक्षक चौकात नाकाबंदी करताना चारचाकी वाहनातून आलेल्या पडघन यांना पोलिसांनी अडविले. त्यांच्याकडे ई-पासची विचारणा केली असता त्यांच्याकडे पास मिळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना दंड भरण्यास सांगितला. यावेळी पडघन यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालून मी अधिकारी आहे. दंड भरणार नाही, असे म्हणत दमदाटी केली. यामुळे पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.