ढाकणे कुटुंबाला समाजाची बांधिलकी - खासदार सुप्रिया सुळे
By Admin
ढाकणे कुटुंबाला समाजाची बांधिलकी - खासदार सुप्रिया सुळे
केदारेश्वर कारखाना स्थळावर ५० बेडच्या कोविड केअर सेंटरचे उभारणी उपक्रम कौतुकास्पद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 21 एप्रिल 2021
आपल्याला समाजाची काही बांधिलकी आहे ही जबाबदारी लक्षात घेऊन ढाकणे कुटुंबाने जनतेच्या आरोग्यासाठी दोन कोविड सेंटर सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन खा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले
बोधेगाव ता शेवगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याच्या तसेच माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्या संकल्पनेतून, कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांच्या पुढाकाराने तसेच तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना स्थळावर ५० बेडचे 'केदारेश्वर या नावाने कोविड केअर सेंटर' व पाथर्डी येथे ५० बेड उभारण्यात आले त्याचे उदघाटन
ऑनलाइन झूम माध्यमाद्वारे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते तर बोधेगाव येथील डॉ प्रमोद जाधव, डॉ विक्रांत घनवट यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना खा सुप्रिया सुळे म्हणाल्या , माजी मंत्री बबनराव ढाकणे तसेच प्रतापराव व प्रभावती ढाकणे हे कुटुंब नेहमीच मतदार संघाच्या कामासाठी अग्रेसर राहिले आहे ढाकणे कुटुंब आज स्वतः कोविडने बाधित असूनही ऋषिकेश ढाकणे नी अत्यंत जबाबदारीने पाथर्डी व केदारेश्वर कारखाना येथे गोर गरीब सामान्य जनता जे आज अडचणीत आहेत त्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न ढाकणे कुटुंबा कडून होत आहे हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे, महाराष्टाचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने मास्क लावा, अंतर ठेवा, हात धुवा या नियमांचे जनतेने काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला खा सुळे यांनी देऊन सुरू असलेले कोरोनाचे युद्ध नक्कीच जिंकू व या उपक्रमास निच्छित यश येईल असा विश्वास व्यक्त केला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ विक्रांत घनवट हे होते.
यावेळी कारखान्याचे संचालक माधवराव काटे, बापूराव घोडके, उपाध्यक्ष प्रकाश घनवट, डॉ प्रमोद जाधव, डॉ विक्रांत घनवट, नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी राजाराम काटे, तलाठी अमर शेंडे, जेष्ठ संचालक सुरेशचंद्र होळकर, रणजित घुगे, खंडागळे ,योगेश खेडकर,
डॉ चंद्रशेखर घनवट, डॉ दीपक फुंदे, डॉ जैन, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपट केदार, के.डी. गर्जे, तीर्थराज घुंगरड, शहाजी जाधव, आयुब शेख, रमेश दुसंगे, अंबादास दहिफळे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ऑनलाइन झूम मिटिंगचे नियोजन सुपरहिट शेवगावचे राजेंद्र श्रीवास्तव,भगवान सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्तविक माधव काटे यांनी केले सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी तर आभार रमेश गर्जे यांनी मानले.
शेवगाव-पाथर्डी मतदार संघात विद्यमान लोकप्रतिनिधीनी अकराशे कोटी मतदार संघात आणल्याचा दावा सांगतात तर त्यातील थोडे जरी स्थानिक आरोग्य विभाग, शासकीय रुग्णालयांना दिले असते तर आज रुग्णांची अशी परवड झाली नसती, फक्त खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल चालवली आहे. खा सुप्रियाताई सुळे यांना कल्पना दिल्याबरोबर त्यांनी सर्व सुविधा देण्याची तयारी दर्शवुन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही प्रतापराव ढाकणे यांना फोनवर आरोग्य व्यवस्था पुरविण्याचे आश्वासन दिले आहे गरजूंनी या कोविड सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहन तज्ञ संचालक, ऋषिकेश ढाकणे यांनी केली आहे.