महाराष्ट्र
137975
10
पाथर्डीत धन्वंतरी पूजनात ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिकांचा सन्मान
By Admin
पाथर्डीत धन्वंतरी पूजनात ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिकांचा सन्मान
पाथर्डी प्रतिनिधी:
भारतीय संस्कृतीमधील सर्वात मोठा सण दीपोत्सवाचा प्रारंभ आरोग्याची अधिष्ठात्री देवता श्री.धन्वंतरीच्या पूजनाने होत असतो.धनसंपत्तीच्या एवढे किंबहुना कांकणभर जास्त महत्त्व आरोग्याला आहे. त्यामुळेच केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर सर्वच ठिकाणी श्री.धन्वंतरी पूजनाचे महत्व आहे.ह्याला अनुसरूनच
श्री.लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठान,श्री.धन्वंतरी योग व फर्टिलिटी सेंटर आणि पाथर्डी तालुका निमा संघटना यांचे वतीने आयोजित धन्वंतरी पूजनात खरवंडी येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ.आश्रुबा जायभाये व तिसगांव येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक व जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त डॉ.बाळकृष्ण मरकड व डॉ.सौ.सुनीता मरकड यांचा धन्वंतरी पुरस्काराने गौरव करण्यात आला.. तर पुणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.अविनाश दराडे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कु.रेवा देशमुख हिच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भगवान धन्वंतरींचे पूजन व दीपप्रज्वलन झाले.पौरोहित्य वेदमूर्ती हरि व ओम देवा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक, श्री.लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठान व पाथर्डी तालुका निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.श्रीधर देशमुख यांनी प्रास्ताविक, श्री.धन्वंतरी योग व फर्टिलिटी सेंटरच्या संचालिका डॉ.सौ.ज्योती देशमुख यांनी स्वागत,श्री.प्रणव देशमुख व सौ.गार्गी देशमुख यांनी सूत्रसंचालन तर ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्य क्षेत्रात सतत कार्यरत डॉ.ज्ञानेश्वर दराडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.विलास बाहेती होते.यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री.अविनाश मंत्री,संदीप शेवाळे, डॉ.दिपक जायभाये,डॉ.जगदीश मुने,डॉ.अभय व डॉ.सौ.सोनाली भंडारी,डॉ.अभय आव्हाड,डॉ.योगिराज देशमुख,डॉ.नितीन शिंदे,डॉ.सौ.सुरेखा लोखंडे,डॉ.सौ.विद्या दराडे,डॉ.अमोल कोतकर,डॉ.प्रमोद सुपेकर,डॉ.वैभव नागरे,डॉ.नितीन शिंदे,डॉ.राहुल वेलदे ,चैतन्य उद्योग समूहाचे श्री.अनंत ढोले पा,श्री.बंडोबा आंधळे,श्री.रविदेवा कुलकर्णी,सौ.वैशाली कुलकर्णी,श्री.आनंद मर्दाने आदी उपस्थित होते.
Tags :
137975
10





