महाराष्ट्र
राष्ट्रीय सेवा योजनेतूनच व्यक्तिमत्त्व विकास
By Admin
राष्ट्रीय सेवा योजनेतूनच व्यक्तिमत्त्व विकास- प्रा.पोपटराव सांबारे
आव्हाड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना+२ स्तर उद्घाटन
पाथर्डी प्रतिनिधी:
येथील बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्यक्तीचा सामाजिक, बौद्धिक विकास व संस्काराची रुजवण होवून व्यक्तिमत्त्व घडते, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक पुणे विभागीय समन्वयक पोपटराव सांबारे यांनी केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मानसिक ताण तणावापासून दूर राहा. स्वतःच्या व कुटुंबियांच्या अरोग्यासंदर्भात जागृत रहा, व्यसनापासून दूर रहा, अभ्यासात सातत्य ठेवा असा सल्ला यावेळी दिला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. ए. चौरे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधनात राष्ट्रीय सेवा योजनेतून आपण स्वावलंबी बनतो व समाजाशी जोडले जात आपल्या व्यावहारिक ज्ञान व सर्वांगीण विकासाची जडण घडणीत वाढ होते, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मणराव राख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राष्ट्रीय सेवा योजनेच्या भरीव कामाबद्दल माहिती दिली.पुणे जिल्हा समन्वयक प्रा. मदन सूर्यवंशी, अहिल्यानगर जिल्हा समन्वयक प्रा. कैलास रहाणे,कार्यक्रम अधिकारी अहिल्यानगर प्रा. पांडुरंग शिंदे, गोवर्धन रोडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम प्रमुख प्रा.सुरेखा चेमटे, कार्यक्रम अधिकारी प्रा.अनिल नारखेडे,प्रा.इंद्रजित बोरले, सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. सलिम शेख, सूत्रसंचालन प्रा.शेखर ससाणे तर आभार प्रा.सुरेखा चेमटे यांनी मानले.
Tags :
28564
10