महाराष्ट्र
शेवगांव तहसील कार्यालयात उदया चोख पोलीस बंदोबस्तात मतमोजणी होणार
By Admin
शेवगांव तहसील कार्यालयात उदया चोख पोलीस बंदोबस्तात मतमोजणी होणार
शेवगाव- प्रतिनिधी
या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव विधानसभा मतदारसंघकरिता मतमोजणी खालील प्रमाणे एकुण मतदान केंद्र: 368:मत मोजणी फेरी संख्या: 27 ई.व्ही.एम. मतमोजणी टेबल संख्या : 14टपाली मतमोजणी टेबल संख्या: 10 ETPBS Scanning करिता टेबल संख्या : 4
मतमोजणी पर्यवेक्षक संख्या: 33 मत मोजणी सहायक संख्या 51
मतमोजणी शनिवार 23/11/2024 रोजी सकाळी 8.00 वाजता तहसिल कार्यालय शेवगांव येथे सुरू होईल.
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात १४ टेबलांवर २७ फेऱ्यांत मतमोजणी करण्यात येणार आहे मतमोजणी १४ टेबलांवर २७ फेऱ्यांत होणार आहे. त्यासाठी ६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून स्ट्रॉगरूमभोवती तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदारसंघात १ लाख ९४ हजार ७४२ पुरुष, १ लाख ७९ हजार ६९४ स्त्रीया, इतर ६ अशा एकूण ३ लाख ७४ हजार ४४२ मतदारांपैकी १ लाख ३७ हजार ६१३ पुरुष, १ लाख २२ हजार १०५ स्त्रीया व इतर ४ अशा एकूण २ लाख ५९ हजार ७२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघात ६९.३६ टक्के मतदान झाले आहे. शनिवारी (दि. २३) सकाळी ८ वाजता शेवगाव तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू होणार आहे. त्यासाठी ६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून १४ टेबलांवर २७ फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. आवश्यकतेनुसार एखादी फेरी वाढू शकते, तर पोस्टल मतमोजणी स्वंतंत्र होणार आहे. मनमोजणीस शेवगाव, पाथर्डी, नगर येथील २०० पोलिस कर्मचारी, १ पोलिस उपविभागीय अधिकारी, ३ पोलिस निरीक्षक, ९ उपनिरीक्षक अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. स्टॉंगरूम भोवती सीआरपी १ प्लॅटून, एसीपी गोवा राज्य प्लॅटून, १५ पोलिस व २ पोलिस अधिकारी अशी सुरक्षा व्यवस्था आहे. तहसील कार्यालयाच्या गेटवर व मागील बाजूस पेट्रोलिंग, तसेच गार्ड ठेवण्यात आले आहेत.
ज्या हलक्या काळजाच्या लोकांना बी पी आणि हार्ट शुगर चा प्रॉब्लेम आहे त्यानी शेवगांव पाथर्डीच्या हाई होल्टेज मतमोजणी पासुन दुर राहावे करण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी मायमोजणी एखाद्याच्या जिवावर बेतु शकते.
Tags :
111198
10