भाग्यलक्ष्मी क्रेडिट सोसायटीतील गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आरोपी जेरबंद
अहिल्यानगर भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट
सोसायटीमधील गैरव्यवहार प्रकरणी पसार असलेल्या मुख्य आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. सहायक पोलिस - निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक - जाधव, नितीन उगलमुगले, राजेंद्र सुद्रीक, किशोर जाधव, - सूरज देशमुख, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुड्डु यांनी ही कारवाई केली.
रोहिदास सदाशिव जाधव (वय ७४, रा. जेऊर, ता. नगर) - यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती. दि. ४ ऑगस्ट २०२२ ते दि. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत वेळोवेळी भारत बबन पुंड (रा. बेलपिंपळगाव, ता. नेवासा, जि. नगर) व त्याच्या साथीदारांनी कटकारस्थान रचून फिर्यादी व ३५० पेक्षा
जास्त ठेवीदारांचा विश्वास संपादन करून त्यांच्या मल्टीस्टेट सोसायटीमध्ये जास्त व्याज दर देतो, रक्कम दामदुप्पट देतो असे आमिष दाखविले. ठेवीदारांच्या रोख रकमेच्या ठेवी घेवून डेली कलेक्शनद्वारे रोख रक्कमा जमा करून घेतल्या त्यानंतर ठेवीदार यांनी त्यांच्या पैशाची मागणी केली असता पुंड व इतरांनी २१ कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी लाभासह परत फेड न करता त्यांनी आर्थिक फसवणूक केली. भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीची जेऊर येथील शाखा बंद करून फसवणूक केली, अशी फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सपोनि माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की, भारत पुंड हा पंढरपूर येथे आहे. पोलिस पथकाने पंढरपूर या ठिकाणी जाऊन आरोपीस सापळा रचून ताब्यात घेतले.