महाराष्ट्र
29282
10
जय भगवान'च्या जयघोषात बडेवाडीमध्ये श्री क्षेत्र भगवानगडाच्या
By Admin
जय भगवान'च्या जयघोषात बडेवाडीमध्ये श्री क्षेत्र भगवानगडाच्या ९२ व्या नारळी सप्ताहाचा प्रारंभ
भगवानगड : श्री संत भगवानबाबांनी प्रारंभ केलेल्या नारळी सप्ताहाच्या ९२ व्या वर्षीचे यजमानपदाचे शिवधनुष्य हे भगवानगडाच्या दक्षिण बाजूला असलेल्या बडेवाडी ग्रामस्थांनी उचलले आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचा आज प्रारंभ झाला. श्री संत भगवानबाबांनी फिरता नारळी सप्ताहाचा नाविन्यपुर्ण उपक्रम ९२ वर्षांपूर्वी श्री क्षेत्र नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या पखालडोह या ठिकाणी सुरू केला. त्यांचे पश्चात तीच सप्ताहाची परंपरा श्री क्षेत्र भगवानगडाचे द्वितीय उत्तराधिकारी अष्टपैलू संत, वै.ह.भ.प.गुरुवर्य श्री संत भिमसिह महाराज यांनी सुरू ठेवत बाबांचे कार्य सुरू ठेवले होते. वै.गुरुवर्य भीमसिंह महाराजांच्या वैकुंठगमनानंतर श्री क्षेत्र भगवानगडाचे तृतीय उत्तराधिकारी तथा विद्यमान मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या सप्ताहाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हा नारळी सप्ताह वैभवशाली असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक सप्ताहामध्ये आठवडाभर उपस्थित असतात. नारळाचे यजमानपद स्विकारलेले ग्रामस्थ आठवडाभर तन, मन आणि धन खर्ची घालत श्रीगुरूंची सेवा करत असतात .
३१ मार्च रोजी हा महोत्सव प्रारंभ झाला असून सप्ताहामध्ये ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली भागवताचार्य ह.भ.प. श्री.प्रकाश महाराज साठे यांच्या अमृततुल्य रसाळवाणीतून ७ दिवस भव्य श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचा उपस्थित लाखो भाविकांना लाभ होणार आहे. सप्ताहामध्ये ह.भ.प.महंत श्री.रामगिरी महाराज (येळेश्वर संस्थान येळी), ह.भ.प. भागवताचार्य श्री.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री, ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर महाराज जळकीकर, ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, ह.भ.प.श्री.प्रभाकर महाराज बोधले पंढरपूरकर, श्री क्षेत्र भगवानगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प.महंत श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांच्या कीर्तन सेवा होणार असून सप्ताहाच्या सातव्या दिवशी रात्री ठीक ८:३० ते ११ या वेळेत श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांचे जागराचे जाहीर हरीकीर्तन होणार आहे. त्यानंतर काल्याच्या दिवशी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहामध्ये दररोज पहाटे काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ इ. धार्मिक कार्यक्रम होत आहेत.
चौकट : *गाव छोटं पण मन मोठं असणाऱ्या बडेवाडीला सहकार्य करा*
श्री क्षेत्र भगवानगडाचा नारळी सप्ताह पार पडत असलेले बडेवाडी हे गाव मनाने आणि श्रद्धेने खूप मोठे आहे. परंतु लोकसंख्येने अत्यल्प असल्यामुळे सप्ताहासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून परिसरातील सर्व गावांनी आलेल्या भाविकांना जेवण वाढण्यासाठी मदत करावी असे आवाहन ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी केले.
येणाऱ्या दसऱ्याला नवीन महंत गादीवर बसवणार
यावर्षी येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी श्री क्षेत्र भगवानगडाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये दसऱ्याच्या दिवशीच श्री क्षेत्र भगवानगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प.महंत श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांचा अभिषेक करून त्यांना श्री क्षेत्र भगवानगडाच्या गादीवर बसवण्यात येणार असल्याची माहिती ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. श्री नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी स्वतः दिली.
Tags :
29282
10




