महाराष्ट्र
10750
10
दादापाटील राजळे महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी
By Admin
दादापाटील राजळे महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी
पाथर्डी न्यूज नेटवर्क
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे महाविद्यालयात आमदार मोनिकाताई राजळे यांचे मार्गदर्शनानुसार महाविद्यालयीन आरोग्य समिती, विद्यार्थिनी मंच व महिला समिती तर्फे विद्यार्थिंनींच्या आरोग्याच्या तपासणी दृष्टीने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि प्राचार्य डॉ. राजधर टेमकर सर नेहमीच विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रेरित करत असतात. महाविद्यालयात शिकणार्या बहुतांश विद्यार्थिनी या ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील आहेत. ते या सामाजिक पार्श्वभूमीतील असल्याने त्यांची आरोग्य तपासणी ही काळाची गरज आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येतात. त्याचा त्यांना दीर्घकालीन फायदा होईल. मुलींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे आणि ग्रामीण भागातील मुलींसाठी मोफत आणि उच्च दर्जाच्या वैद्यकीय तपासणी करणे, आहार आणि व्यायाम याबाबत माहिती देणे हा या वैद्यकीय शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
महाविद्यालयात आरोग्य समिती, महिला समिती व विद्यार्थिनी मंच तर्फे हिंद लॅब शेवगाव यांच्या सहकार्याने विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दि. 03 जानेवारी 2026 रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रा. कल्पना कुटे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थीनी समोरील आव्हाने व त्यातून होणारे मार्गक्रमण याविषयी मार्गदर्शन केले. उद्घाटनानंतर निखिल वाघ, विराज, किरण केदार, शिवानी शिंदे या डॉक्टरांच्या पथकाने मुलींची संपूर्ण आरोग्य तपासणी केली. त्या शिबिरात प्रत्येक मुलीच्या रक्ताचा नमुना घेऊन प्रत्येक मुलीच्या थायरॉईड, L. F. T., R. F. T. आणि Hb-इलेक्ट्रोफोरेसीस चाचण्या करण्यात आल्या. CBC मध्ये हिमोग्लोबिन, RBC, PCV, MCV, MCH, MCHC, RDW-CV, ल्युकोसाइट्स, पॉलिमॉर्फ्स, लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स त्यांची संख्या तपासण्यात आली. काही समस्या असलेल्या मुलींना पुढील तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला.
प्राचार्य डॉ.आर . जे. टेमकर सर यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्याची माहिती दिली महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली व त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य, आहार, योगासने, विद्यार्थ्यांना भेडसावणारी आव्हाने आणि घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.या आरोग्य तपासणी शिबिरात विद्यार्थ्यांनी व महिला शिक्षिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य समिती समन्वयक प्रा. डॉ. निर्मला काकडे, प्रा. डॉ. साधना म्हस्के, प्रा. प्रकाश गाढवे, प्रा . बळीराम चव्हाण यांनी केले. आरोग्य शिबिरासाठी कार्यालयीन अधिक्षक श्री. विक्रमराव राजळे, डॉ. गोविंद नरसाळे, हिंद लॅब शेवगाव, यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. राजकुमार घुले, प्रा . सुनंदा बडे प्रा. महेश गोरे, प्रा. अनिता पाटोळे, प्रा योगिता इंगळे, रेणुका औटी, , प्रा. स्वाती सातपुते, तेजस्विनी राजळे, कविता वीर श्री प्रवीण कुसाळकर यांनी सहकार्य केले.
Tags :
10750
10




