महाराष्ट्र
49528
10
दादापाटील राजळे महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
By Admin
दादापाटील राजळे महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव मा. श्री भास्करराव गोरे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आय. क्यू. ए. सी. समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ. राजू घोलप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी विचार मांडताना सांगितले की थोर व्यक्तिमत्वांना कोणत्याही मर्यादित समूहाच्या चौकटीत न अडकवता त्यांच्या विचारांची जोपासना सर्व सामाजिक स्तरांमधून व्हायला हवी हीच खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेत भारताच्या आधुनिकतेची बीजे रोवलेली आहेत असे विचार त्यांनी मांडले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एस. तांबोळी यांनी सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांची रुजवणूक भारतीय समाजामध्ये झाली. त्यांनी राज्यघटना लिहिताना त्यांनी सर्व तळागाळातील सामान्यातील सामान्यांचे हित कसे होईल हे पाहिले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक काळे, डॉ. साधना म्हस्के, डॉ. किशोरकुमार गायकवाड, डॉ. विलास बनसोडे, डॉ. जालिंदर कानडे, डॉ. राजकुमार घुले,डॉ. अतुल चौरपगार, डॉ. रोहित अदलिंग, प्रा राजेंद्र इंगळे प्रा. सुनंदा बडे, प्रा. मिसाळ प्रा. गोरख अकोलकर, प्रा. उमेश तिजोरी व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर, कार्यालयीन अधीक्षक मा. श्री. विक्रमराव राजळे यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग डॉ. आसाराम देसाई, प्रा. दुर्गा भराट, प्रा. योगिता इंगळे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
Tags :
49528
10




