Breaking News- मोटर सायकल चार चाकी वाहन चोरी घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात
४,१०,००० रु किं चा मुद्देमाल हस्तगत श्रीगोंदा पोलिसांची कामगिरी
श्रीगोंदा
सविस्तर असे की दिनांक १४/०३/२०२१रोजी
फिर्यादी योगेश शंकर दिवखिळे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की त्यांच्या मालकीची ७० हजार रुपये किमतीची बुलेट मोटर सायकल त्यांच्या घरासमोरुन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली तसेच गावातील मोबाईल चोरी गेली होती त्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार श्रीगोंदा पोलिसांनी तपास करत असताना गुप्त बातमीदारा मार्फत पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांना माहिती मिळताच सराईत गुन्हेगार शंकर ऊर्फ हाडया मधुकर पवार यास ता.भूम,जि.उस्मानाबाद यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील गुन्ह्यातील बुलेट मोबाईल आणि सोलापूर व पुणे जिल्ह्यातून चोरलेल्या ५ मोटरसायकली व २ मोबाईल असा ४१०००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याच्यावर १४ विविध गुन्हे विविध पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहेत.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक मनोज पाटील ,अप्पर पोलिस अधिक्षक सोरभ कुमार
आग्रवाल,कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव ,श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली
स.पो.नि-दिलीप तेजनकर,पोहेका अंकुश ढवळे ,पोकों
प्रकाश मांडगे,पोकों गोकुळ इंगावले,पोको किरण बोराडे,पोको दादा टाके ,पोको प्रशांत राठोड यांनी केली आहे.पुढील तपास पो.हे.कॉ विठ्ठल बडे हे करत आहेत.