आचारसंहितेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By Admin
हवाल्याचे ४५ लाख रूपये जप्त
आचारसंहितेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संगमनेर शहरातील सहदेव ज्वेलर्स येथे दोघेजण हवाल्यामार्फत मोठ्या रकमेची विल्हेवाट लावत असलेल्या दोघांसह तब्बल ४२ लाख १५ हजार रूपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हयात बेहिशोबी मालमत्ता बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत.
त्यानुसार आहेर हे जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमांची माहिती घेत असतांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली
की, संगमनेर शहरामध्ये सहदेव ज्वेलर्स येथे भावेश पटेल व आशीष सुभाष वर्मा हे त्यांच्या साथीदारासह त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त रोख रक्कम शासनाचा कर भरणे आवश्यक असताना बेकायदेशीरपणे हवालामार्फत विल्हेवाट लावत आहेत. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई. तुषार धाकराव व पोलीस अंमलदार अतुल लोटके, अमृत आढाव तसेच मनोज गोसावी व रमीजराजा आत्तार यांना कारवाईच्या सुचना दिल्या. या तपास पथकाने संगमनेर शहरात पार्श्वथान गल्ली येथील सहदेव ज्वेलर्सच्या वरच्या
मजल्यावरील खोलीमध्ये जाऊन खात्री केली असता दोन इसम मिळून आले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असा त्यांनी आपली नावे मुकेशकुमार रमेशभाई पटेल (रा. पार्श्वनाथ गल्ली, जैन मंदिराजवळ, संगमनेर मुळ राहणार गोठवा, ता. विसनगर, जिल्हा म्हैसाणा, गुजरात) धवलकुमार जसवंतभाई पटेल (रा. पार्श्वनाथ गल्ली, जैन मंदिराजवळ, संगमनेर मुळ रा. ठलोटा, ता. विसनगर, जि. म्हैसाणा, गुजरात) असे सांगीतले. त्यांच्याकडे असलेल्या रोख रक्कमेबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरची रक्कम हवाल्याची असल्याचे सांगून ती त्यांचे मालक भावेश रामाभाई पटेल (रा. पार्श्वनाथ
गल्ली, संगमनेर) व आशीष सुभाष वर्मा (रा. अहिल्यानगर) यांची असल्याचे सांगीतले. तपास पथकाने अधिक चौकशी केली असता मुकेशकुमार रमेशभाई पटेल व धवलकुमार जसवंतभाई पटेल यांचेकडे असलेली रक्कम ही त्यांनी कोठूनतरी बेकायदेशीर मार्गाने जमवून शासनाचा कर चुकवून स्वतःचे फायदयाकरीता हवाल्यामार्फत विल्हेवाट लावण्याकरीता मिळून आल्याची खात्री झाल्याने त्यांच्या कब्जामधुन एकूण ४२ लाख १५ हजार रूपये रोख रक्कम जप्त केली आहे. या रक्कमेबाबत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया चालू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबमें, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर कुणाल सोनवणे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

