सरकारी व खाजगी शाळा सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात -परमेश्वर टकले
पाथर्डी प्रतिनिधी:
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने खाजगी व सरकारी शाळांचे वेळापत्रक बदल करणे गरजेचे आहे.मार्च महिना सुरू असल्याने उन खूप वाढत आहे .सध्या शहरात व तालुक्यात जवळपास सर्व शाळा बारा ते पाच अशा वेळेत असल्याने मुले आजारी पडत आहेत, त्यामुळे शिक्षण विभागांनी लवकरात लवकर शाळेचे वेळापत्रक सकाळच्या वेळेत करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
उन्हामुळे शाळांतील उपस्थिती घटत आहे. दुपारची वेळ असल्याने मुलांना चक्कर येणे ,ताप येणे असे आजार वाढत चालले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात मुलांचे वार्षिक परीक्षा असल्याने मुले आजारी पडल्यास परीक्षा वर त्याचा परिणाम होऊ शकतो.तरी लवकरात लवकर सकाळची शाळा सुरू करावी, अशी मागणी पालकांच्यावतीने या ठिकाणी करण्यात येत आहे.