'या' ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना तपासणी किट नसल्याने चाचण्या बंद
तिसगाव प्राथमिक आरोग्य केंदातील प्रकार, प्रशासनासह नागरिक चिंतेत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - शनिवार 01 मे 2020
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना चाचणी किटचा गेल्या काही दिवसांतपासून तुटवडा आहे.त्यामुळे कोरोना तपासण्या चाचण्याही ठप्प झाल्या आहेत.तसेच कोरोना प्रतिबंधक लसीचीही पुरेशी उपलब्धता नसल्याने नागरीकासह आरोग्य प्रशासन हैराण झाले आहे.
कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची तिसगाव आरोग्य केंद्रात चाचणी करण्यात येते.प्रतिदिन 200 ते 250 रुग्णांची तपासणी केली जात आहे.माञ रविवारी किट संपले आहेत.त्यामुळे लक्षणे असणाऱ्या नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी पाथर्डी येथेचाचणीसाठी जावे लागत आहे.तालुक्याच्या पश्चिम भागातील मोठ्या लोकसंख्येची 23 गावे तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत येतात.कार्यक्षेत्र व लोकसंख्याही मोठी आहे.लसीसह चाचण्या किटची उपलब्धता प्रशासनाने लवकर करावी,अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.
चाचणी किटचा तुटवडा निर्माण झाला आहे.लस शुक्रवारी उपलब्ध झाली आहे.जिल्हास्तरावर किटची मागणी केली आहे.किटसुद्धा लवकरच प्राप्त होतील.
डाॕ. बाबासाहेब होडशिळ
वैद्यकीय अधिकारी ,
तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र