शिक्षणाधिकारी आणि पदवीधर डी.एड., कला, क्रीडा संघातील चर्चा सकारात्मक
पदवीधर डी.एड., कला, क्रीडा संघाचे बेमुदत उपोषण मागे
अहिल्यानगर प्रतिनिधी:
अहिल्यानगर जिल्हा परिषदेसमोर दि. १६ डिसेंबर पासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि पदवीधर डी.एड. कला, क्रीडा संघाचे राज्य पदाधिकारी यांची सकारात्मक चर्चा होऊन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांचे लेखी पत्रानंतर चार दिवसापासून सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले.
जिल्हासचिव विजय विधाते आणि जिल्ह्यातील इतर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत राज्य कार्यकारणी सदस्य मिलिंद काळपुंड यांचे मार्गदर्शनाखाली बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. प्रलंबित प्रश्नांमध्ये जिल्हाध्यक्ष रंगनाथ मोरे यांची निवड श्रेणीच्या प्रस्तावास मान्यता, विजय विधाते यांच्या शिक्षक पदावरील नियुक्तीस मान्यता, सचिन देशमुख यांच्या मान्यतेचा प्रस्ताव, नरेश साळवे नियुक्ती मान्यता प्रस्ताव, सुनिल अहिरे यांची शिपाई पदावरून शिक्षक पदावर पदोन्नती बाबत, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था, कृषी विद्यापीठ राहुरी संस्था तसेच जिल्ह्यातील सर्व संस्थांना दि. २४ मार्च २३ च्या अधिसूचनेनुसार शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी करणे या सर्व मागण्यांच्या संदर्भात शिक्षणाधिकारी व पदवीधर डी.एड. संघाचे राज्यसचिव महादेव माने, कार्याध्यक्ष बाजीराव सुपे तसेच महिला आघाडीच्या राज्यप्रमुख रंजना सपकाळे यांच्यातील सकारात्मक चर्चेतून दिलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेखी पत्रानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषणकर्त्यांच्या बेमुदत उपोषणात राज्य सरचिटणीस सदस्य मिलिंद काळपुंड, प्रकाश आरोटे, विरेश नवले, रंगनाथ मोरे ,राजेंद्र चव्हाण, अरुण शेलार, कमलेश पवार, गोकुळ ठाकूर, शांताराम वाकळे, शिवाजी गोर्डे, नानासाहेब भोर, मिना सदाफुले, अंजली विधाते, कल्पना जिवडे, मनिषा जगदाळे, कैलास घोडके आदी राज्यातील व जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.