महाराष्ट्र
2207
10
प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नारायण लोहरे
By Admin
प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नारायण लोहरे
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील नारायण लोहरे यांची तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाली आहे.तसेच
आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच
संतोष शिरसाट यांची व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवृत्ती सखाराम तळपाडे, ज्ञानेश्वर भोईर, काशिनाथ भोईर, भगवंत झोले, कैलास भावारी, मारुती कुंदे, दिलीप धांडे, लक्ष्मण खातले, संपत धांडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या निवडणूक प्रकियामध्ये
आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे नऊ संचालक निवडून आले होते.
संस्था पातळीवर निवडणूक झाझी असली तरी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे.
तालुक्याच्या दृष्टीने ही खूप मोठी भूषणावह व आनंदाची बाब आहे.
व ऐतिहासिक घटना आहे.
असेच सर्व संचालकांनी आपापले मतभेद विसरून पतसंस्थेच्या विकासासाठी हातभार लावावा. असे महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.
पतसंस्था हिताचे निर्णय घेतले जातील.तसेच सेवकाचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाईल.कोणाचीही अडवणूक केली जाणार नाही.संस्था कार्यवाही व्यवस्थितपणे पार पाडली जाईल. संस्था तसेच शिक्षकांनी ठेवलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही.अचूक व चांगले सभासद हिताचे निर्णय घेतले जातील.
असे संचालक मंडळ यांनी यावेळी सांगितले.
संचालक मंडळ पुढीलप्रमाणे -
नारायण लोहरे -चेअरमन
संतोष शिरसाट -व्हा चेअरमन
गोरख तारडे -संचालक
जनार्दन करवंदे - संचालक
देविदास हिंदोळे- संचालक
तुकाराम सारुकते -संचालक
नामदेव साबळे- संचालक
दत्तू साबळे- संचालक
श्रीमती सुगंधा कोरडे -संचालिका
श्रीमती शीला गातवे- संचालिका
श्रीमतीमंजुषा सानप- संचालिका,
वरील सर्व संचालक यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शिक्षकांनी दिल्या.
Tags :

