कापुस चोरायला आलेल्या चोरट्यांनी केला शेतकऱ्यांचा खून
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कडगाव शिवारात कारभारी
रामदास शिरसाट (वय-५५) यांचा खुन केला आहे. कडगाव शिवारात शुक्रवारी
रात्री उशीरा ही घटना घडली आहे. शिरसाट यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी
नगरला नेला आहे. अतिरिक्त पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपअधिक्षक सुनिल
पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
शुक्रवारी रात्री काही चोरटे शिरसाट यांच्या वस्तीवर आले. घरापासुन
थोड्या अतंरावर एक पत्र्याचे शेड आहे. तेथे कारभारी शिरसाट हे झोपले
होते. तेथील कापुस चोरट्यांनी दहा ते बारा गोण्यात भरला व उसात नेहुन
टाकला. कापुस नेहताना कारभारी शिरसाट यांना जाग आली असावी. त्यानंतर
चोरटे व शिरसाट यांच्यात बाचाबाची होवुन शिरसाट यांच्या डोक्यात जबर
मारहान करण्यात आली. त्यांच्या कानातुन रक्त वाहत होते. ही घटना रात्री
किती वाजता घडली हे निश्तीच कळले नाही. त्यानंतर चोरटे कापसाच्या गोण्या
उसात ठेवुन तसेच पळुन गेले. सकाळी उठल्यानंतर शिरसाट यांच्या पत्नी
पत्र्याच्या शेडकडे गेल्या तेव्हा ते बाजेवर पडलेले दिसले. तेव्हा
त्यांचा मृत्यु झालेला होता. पोलिस अधिकारी, विविध विषयाचे तज्ञ यांनी
घटनास्थळी भेट दिली आहे. पोलिस अधिकारी तपास करीत आहेत.