महाराष्ट्र
2428
10
बालेकिल्लात काँग्रेसला घरघर? विखे पाटील यांच्यानंतर आता थोरात-तांबेचं बंड,
By Admin
बालेकिल्लात काँग्रेसला घरघर? विखे पाटील यांच्यानंतर आता थोरात-तांबेचं बंड, काँग्रेसचं काय चुकलं?
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा अंतर्गत कलह मोठ्या वळणावर येऊन पोहोचलाय. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. यामुळे बाळासाहेब थोरात नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर केल्याची चर्चा सुरु आहे.
विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा (Congress) अंतर्गत कलह मोठ्या वळणावर येऊन पोहोचलाय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती दिल्लीतील (Delhi) काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय घेणार? थोरातांचं मन वळवणार की, नवा बदल घडवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोरातांच्या नाराजीचं कारण काय ?
विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा अंतर्गत कलह मोठ्या वळणावर येऊन पोहोचलाय. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. यामुळे बाळासाहेब थोरात नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर केल्याची चर्चा सुरु आहे.
पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य - थोरात
नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवेळी पक्षाने दिलेल्या चुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. याशिवाय बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यांच्या या पत्रानंतर पक्षासह राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला.
काँग्रेसला घरघर ?
एका बाजूला राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'ला मिळालेला प्रतिसाद आणि विधानपरिषद निवडणुकीत कॉंग्रेसच्या आलेल्या दोन जागा अशा जमेच्या बाजू असतांनाही, प्रदेशाध्यक्षांबद्दलच्या नाराजीच्या या प्रकरणानं कॉंग्रेस महाराष्ट्रात अधिक खोलात चालली आहे का, हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. "विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यथित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे," असं गेल्या अनेक दिवसांच्या वादादरम्यानही शांत असलेल्या बाळासाहेब थोरातांनी आता म्हटलं आहे. ते जरी 'यावर बाहेर बोलण्याच्या मताचा' मी नाही असं ते पुढे म्हणाले असले तरीही हे पेल्यातलं वादळ ठरण्यची शक्यता नाही
नजीकच्या इतिहासातली उदाहरणं
जेव्हा विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते असतांनाच राधाकृष्ण विखे पाटील 2019 च्या निवडणुकीअगोदर भाजपामध्ये गेले होते कॉंग्रेसवर नामुष्की ओढवली होती. पण तरीही त्यानंतर कॉंग्रेसनं विधानसभा निवडणुकीत आपल्या बहुतांश जागा वाचवल्या. बाळासाहेब थोरातांकडेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यानंतर कॉंग्रेस सत्तेत परतल्यावर सगळं स्थिरस्थावर होण्याची अपेक्षा होती. पण तेव्हाही गटबाजीच्या चर्चा पक्षात होत्याच. अंतर्गत गट किंवा स्पर्धा हे काही कॉंग्रेसला नवीन नाही. अलिकडच्या काळात मराठवाड्यात देशमुख आणि चव्हाण, अहमदनगरमध्ये थोरात आणि विखे, मुंबईत कामत, निरुपम, कृपाशंकर, देवरा असे गट ही काही ठळक उदाहरणं. कधी हे मतभेद चव्हाट्यावर येऊन पक्षाला त्याचा फटका बसणं हे मागंही झालं आहे. सध्याच्या परिस्थितीत हे पक्षाला परवडणारं आहे का?
कॉंग्रेसमधील खदखद
आजही अनेक कॉंग्रेसच्या नेत्यांची नावं ते भाजपाच्या वाटेवर आहेत असं सांगितलं जातं. राहुल यांच्या यात्रेदरम्यान हे भाजपाप्रवेश होतील असे कयास लावले जात होते. ते प्रत्यक्षात झालं नाही तरीही त्यात तथ्य नाही असंही कोणी म्हटलं नाही. कॉंग्रेसमधली ही अंतर्गत धुसफूस सत्यजित तांबे प्रकरणात बाहेर आली. वरिष्ठ नेतेच एकमेकांना कसं शंकेनं बघतात हेही समोर आलं. सत्यजित तांबेंनी उमेदवारीवरुन केलेले आरोप, त्याला बाळासाहेब थोरातांनी एका प्रकारे दिलेला दुजोरा आणि नाना पटोलेंच्या गटानं दिलेली प्रत्युत्तरं यामध्ये कॉंग्रेसचं आतलं चित्र बाहेर आलं. कॉंग्रेसमध्ये पिढ्यांपासून असणाऱ्या एका घराण्याबद्दल असं होणं थांबवता आलं असतं का? हे प्रकरण आता कुठपर्यंत जाईल?
Tags :

