अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील नानी नदीपात्रात पोलिसांनी छापा टाकून वाळूची चोरी करून विक्रीसाठी वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केला.
याप्रकरणी नितीन विठ्ठल मासाळ (वय 25), शुभम भाऊसाहेब म्हस्के (वय 22, दोन्ही रा. कोरडगाव) यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल समीर शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.
पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील कोरडगाव शिवारातील कोरडगाव-बोधेगाव रस्त्यावर नानी नदीपात्रात मोठा वाळूसाठा आहे. रविवारी ट्रॅक्टरद्वारे नदीपात्रातील वाळूचा उपसा करून वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर चव्हाण व पोलिस नाईक संदीप कानडे, ईश्वर गर्जे, ईश्वर बेरड, ज्ञानेश्वर रसाळ, संदीप कळमकर, लक्ष्मण पोटे, अमोल कर्डिले यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई करीत दोघांना अटक केली. कोरडगाव परिसरातील जिरेवाडी नदीपात्रातही वाळू उपसा सुरू असून, वाळूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.