स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; नगर-पाथर्डी महामार्गावर घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर-पाथर्डी महामार्गावर मेहेकरी शिवारात सद्गुरू हायस्कूलसमोर स्कॉर्पिओची धडक बसून मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. 4) दुपारी हा अपघात झाला.
शंकर विष्णू कानडे (वय 36, रा. आलमगीर रोड, ब्रह्मतळे, भिंगार) असे मयताचे नाव आहे. कानडे हा सेंट्रिंग काम करीत होता. तो कामानिमित्त मोटारसायकलने भिंगारहून मेहेकरी शिवारात गेला होता. मंगळवारी दुपारी 2.30 वाजता त्याच्या मोटारसायकल भरधाव स्कॉर्पिओची धडक बसली.
त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. स्कॉर्पिओ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तपासी अंमलदार राजेंद्र ससाणे यांनी सांगितले.