महाराष्ट्र
31155
10
एक मराठा लाख मराठा' असे वहीवर लिहून युवकाची आत्महत्या
By Admin
एक मराठा लाख मराठा' असे वहीवर लिहून युवकाची आत्महत्या
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदनगरमध्ये दोघांच्या आत्महत्या ! जिल्ह्यात खळबळ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आम्ही जातो आमच्या गावा.., एक मराठा लाख मराठा वहीत लिहून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि 31) पहाटे घडली. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने संगमनेर तालुक्यातील झोळे येथील सागर भाऊसाहेब वाळे (वय 25) या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर वाळे हा तरूण झोळे येथून संगमनेरला कामासाठी येत असे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे घरातील सर्व जेवण करून झोपले होते. मंगळवारी पहाटे सागर हा घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. घटनास्थळी एक वही सापडली असून त्यामध्ये आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. एक मराठा लाख मराठा.
आपला लाडका सागर मराठा असा उल्लेख चिठ्ठीत केलेला आहे. दरम्यान, घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, उपनिरीक्षक इस्माईल शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आरक्षणासाठी मृत्युला कवटाळण्याचे लोण अहमदनगर जिल्ह्यातही पसरायला लागले आहे. काल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील दोघा जणांनी आत्महत्या केल्या आहेत.
एकजण संगमनेर तालुक्यातील झोळे येथील तर दुसरा नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील आहे.
आत्महत्यांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे
आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे आपण फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. आपला लाडका सागर मराठा अशी चिठ्ठी लिहून मराठा आरक्षणासाठी २५ वर्षीय युवकाने राहत्या घराच्या मागील शेडमध्ये गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना काल मंगळवारी पहाटे तालुक्यातील झोळे गावात घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सागर भाऊसाहेब वाळे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सागरने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले असून तो संगमनेर शहरातील एका खासगी उद्योग समूहात नोकरी करत होता. काल पहाटे त्याने घरामागे असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्याच्या घरातील व्यक्ती झोपेतून उठल्यानंतर शेडमध्ये त्यांना सागर याचा मृतदेह आढळला. त्याने लिहिलेली एक चिठ्ठी या ठिकाणी सापडली. ‘आम्ही जातो आमच्या गावा एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. आपला लाडका सागर मराठा,’ असा उल्लेख चिठ्ठीत केला असल्याचे दिसून आले.
Tags :
31155
10





