गौरव वारघडे विद्यार्थी खेळाडूची महाराष्ट्र राज्य पातळीवर निवड
नाशिक - प्रतिनिधी
भारत सर्व सेवा संघातील इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील
न्यु इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयातील गौरव अर्जुन वारघडे विद्यार्थी खेळाडूने नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेत नेञदिपक यश मिळवत तसेच खेळात उत्तम कामगिरी करत महाराष्ट्र राज्य पातळीवर निवड झाली.त्यांचे हार्दिक अभिनंदन प्राचार्य कांबळे सर, भारत सर्व सेवा संघ संस्था अध्यक्ष राजेंद्र नलगे साहेब, सचिव प्रकाश जाधव साहेब तसेच संस्था पदाधिकारी सदस्य माजी शिक्षक,माजी मुख्याध्यापक,शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांनी करुन शुभेच्छा पुढील स्पर्धैसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेसाठी दररोज नियमित केलेला सराव तसेच आई वडील यांचा आर्शिवाद यांच्यामुळे आज मला यश मिळाले.या यशामध्ये माझे गुरु तसेच मिञ परीवार,शिक्षक, कोच यांनी मला मार्गदर्शन केले.कोणत्याही स्पर्धेसाठी आत्मविश्वास आवश्यक आहे.
गौरव वारघडे
विद्यार्थी कुस्ती खेळाडू