आंदोलने-निवेदने फेल, नगर-मनमाड महामार्गाचं शेवटी श्राद्ध घातलं! तरीही प्रशासन ढिम्मचं
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर-मनमाड महामार्गाच्या (Nagar-Manmad Highway) रस्त्याच्या दुरावस्थेमुळे (Road Damage) गेल्या काही वर्षात शेकडो प्रवाशांना आजवर आपला जिव गमवावा लागला असून रास्ता दुरुस्तीसाठी अनेकदा आंदोलनासह निवेदने दिली गेली.
मात्र रस्ता आजही पूर्ण दुरुस्त झाला नाही. सरकार असो वा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आतापर्यंत जाणीवपूर्वक दूर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीकांनी करत थेट महामार्गावर दशक्रियाविधी घालत अनोख्या पद्धतीने निषेध (Protest) केला.
गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था झाली आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या नगर-मनमाड महामार्गावर महाकाय खड्डे (Potholes) पडल्याने साईभक्तांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता वर्ग होऊनही या महामार्गाची टेंडर प्रक्रिया रखडली आहे. तर काही महिन्यांपूर्वी ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्याने महामार्ग खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. शिवाय अहमदनगर मनमाड महामार्ग केंद्राकडे वर्ग झाला असून कामाची निविदा निघाली. त्यानंतर कामही सुरू झाले होते. मात्र ठेकेदाराने काम अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. याचा फटका प्रवाशांना बसत असून अनेकदा अपघात होऊन प्रवाशांना जिव गमवावा लागत असल्याचे समोर आले आहे.