लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे - प्रांताधिकारी प्रसाद मते
श्री आनंद महाविद्यालय येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा
पाथर्डी प्रतिनिधी:
अमोल म्हस्के
पाथर्डी येथील श्री आनंद महाविद्यालय तहसील कार्यालय निवडणूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री आनंद महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी प्रसाद मते होते.
कार्यक्रमाची सुरुवात आनंद ऋषीजी महाराज साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. डॉ. शेषराव पवार म्हणाले, युवकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाची सुट्टी इतर कामासाठी न वापरता पसंतीचा उमेदवार निवडून मतदान करावे.
यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते, प्राचार्य शेषराव पवार, निवडणुक नायब तहसिलदार रमेश ससाणे, प्रा. बुथवेल पगारे, डॉ. मुक्तार शेख, प्रा. संजय नरवडे, डॉ. जगन्नाथ बरशिले,प्रा. इस्माईल शेख, आकाश माने आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. निवडणूका हे लोकशाही जिवंतपणाचे लक्षण आहे. मतदान न करणे म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन प्रत्येकाने आपल्याला राज्यघटनेने दिलेला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिता पावशे यांनी केले तर प्रा. इस्माईल शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.