महाराष्ट्र
7226
10
चढाला चढत नाही...अन् उताराला थांबत नाही
By Admin
चढाला चढत नाही...अन् उताराला थांबत नाही
पाथर्डी आगारातील एसटी बसेसची अवस्था
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
चढाला चढत नाही आणि उताराला थांबत नाही, अशीच काही म्हणण्याची वेळ पाथर्डी आगारातील एसटी बसेसची झालेली आहे. सोमवारी पाथर्डीच्या आगारातून अनेक ठरलेल्या वेळेच्या लांब पल्ल्याच्या एसटी बस गाड्या न सुटल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
नव्या आणि जुन्या बस स्थानकावर एसटी बस न आल्याने नागरिकांचे मोठ्या स्वरूपात हाल झाले.
पाथर्डी आगर हा फक्त नावाला उरले असून, येथील दहा गाड्या नादुरुस्त होऊन गाडीचे सुटे भाग नसल्याने बंद आहेत. सोमवारी दुपारी पाथर्डीहून पुण्याला जाणारी बस करंजी घाटामध्ये नादुरुस्त झाल्याने प्रवासी तिथेच उतरून द्यावे लागले. अशी अवस्था नित्याची पाथर्डी आगाराच्या बसेस बाबतीत झाली आहे. एकेक दिवशी चार ते पाच एसटी बस गाड्या नादुरुस्त होऊन रस्त्यावरच बंद पडल्याच्या घटना सध्या घडत आहेत.
पाथर्डी आगाराच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवरूनही खास लक्ष न नाही, तर आगारातील मागणीनुसार कोणतीच गोष्ट उपलब्ध नसल्याने आगार आता दिवाळखोरीकडे जाण्याचे लक्षणे आहेत. पाथर्डी आगाराला मागील आठवड्यात दोन नवीन बस देण्यात आल्या होत्या, त्याही पुन्हा जिल्ह्याच्या ठिकाणी वर्ग करण्यात आले आहे. त्याऐवजी दोन जुन्या गाड्या पाथर्डीला देण्यात आल्या. जुन्या गाड्यांचा भंगार डेपो पाथर्डीचा झाला आहे.
मुकुंद गर्जे यांनी जिल्हा विभागीय नियंत्रण अधिकार्या दिलेल्या निवेदनात म्हटले की, कोणत्याही बस डेपो बाहेर वेळेवर जात नाही. त्याची विचारपूस केली असता, काही बस खराब झालेल्या आहेत. डेपो मॅनेजरला जाब विचारण्यासाठी सोमवारी गेलो असता त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने उत्तरे दिली. आपण बस वेळेवर सोडणार नसाल तर डेपोमध्ये तसा फलक लावावा. 'आम्ही बसस्थानकामधून बस वेळेवर सोडू शकत नसल्याने आपण इतर खासगी वाहनांचा वापर करावा,' यावरून 'तू तू मैं मैं', करून ते तेथून निघून गेले. तरीही त्यानंतर कुठलीही बस वेळेवर गेली नाही. माझ्यासह अनेक अनेक प्रवाशांना खासगी वाहनाने परगावीचा प्रवास करावा लागला. पाथर्डी आगारातील बससेवा वेळेवर पुर्ववत कराव्यात जेणेकरून आपल्या वेळेवर प्रवाशांची कामे अवलंबून असतात, प्रवाशांचा आपल्या बस वेळेवर विश्वास असतो तो विश्वस तुटता कामा नये. तसेच अवैध खासगी वाहतुकीस बळ देण्याचा प्रकार घडू नये. यामध्ये सुधारणा न झाल्यास आपणास कुठलीही पूर्व कल्पना न देता तीव्र आंदोलन करण्यात येईल.
दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा
पाथर्डी आगारातील एकही बस वेळेवर जात नाही. बसेसच्या देखभाल दुरुस्तीसाठी साधनसामग्री नसल्यामुळेही गाड्या वेळेवर दुरुस्त होत नाही. रस्त्यावर गाड्या बंद पडण्याचे प्रमाण पाथर्डी डेपो एक नंबरला आहे. नवीन गाड्या पाथर्डी आगाराला मिळाव्यात. या सर्व बाबींबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता महाविकास आघाडीतर्फे पाथर्डी आगार बंद करण्याचा इशारा काँग्रेस तालुका अध्यक्ष नासिर शेख यांनी दिला.
पाथर्डी एसटी आगारातील सावळा गोंधळ सुरू असल्याने नागरिकांची पिळवणूक होत आहे. सोमवारी कोणतीही बस वेळेत नाही. सकाळची साडेसात व नऊची पुण्याला जणारी बस वेळेवर नाही. लांब पल्ल्याची सकाळची साडेसातची कोल्हापूर बस नऊला गेली. पाथर्डी बस स्थानक प्रशासनाने प्रवाशांची चालवलेली हेळसांड थांबवावी, प्रवाशांना ठरवलेल्या वेळेत बस उपलब्ध करून द्यावी.
-मुकुंद गर्जे, सामाजिक कार्यकर्ते,पाथर्डी
Tags :

