राजश्री शाहू महाराज पतसंस्थेच्या वतीने भगवान बाबांना अभिवादन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील राजश्री शाहू महाराज शासकीय पतसंस्थेच्या वतीने पतसंस्थेच्या कार्यालयात थोर समाज सुधारक संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. संत भगवान बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राजश्री शाहू महाराज शासकीय पतसंस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष दिगंबर गाडे यांनी मनोगत व्यक्त केले. गाडे म्हणाले की, "सत्याच्या मार्गावर चालण्याची भगवान बाबांची शिकवण जोपासूया" हा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन दिगंबर गाडे यांनी केले होते.
कार्यक्रमास दिगंबर गाडे, कलाशिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम दहिफळे, श्री तिलोक जैन विद्यालयाचे कार्यालय प्रमुख महेंद्र राजगुरू, हाजी हुमायून आतार, ईश्वर गायकवाड, वसंत दादा विद्यालयाचे लिपिक सतिश बडदे आदी मान्यवरांची उपस्थित होते.
यावेळी कला शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम दहिफळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.