जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी हे दोन नावे चांगली चर्चेत आज मिळणार अध्यक्ष
अहमदनगर- प्रतिनिधी
नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीसाठी शनिवारी नवीन संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही सभा दुपारी १ वाजता बँकेच्या मारुतराव घुले पाटील सभागृहात होणार आहे.
अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले व राहुल जगताप या दोघांची नावे चर्चेत होती.
अध्यक्ष निवडीच्या एक दिवसआधी शुक्रवारी वेगाने चक्रे फिरली व आणखी दोन नावे चर्चेत आली. यामध्ये एक पारनेरचे उदय शेळके, तर दुसरे नाव श्रीरामपूरचे भानुदास मुरकुटे यांचे आहे.यापैकी कोण, याचा निर्णय शनिवारीच घेतला जाणार आहे.
याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार असल्याने अध्यक्षपदासाठी कुणाचे नाव येते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.अध्यक्ष पदासाठी ज्या चार संचालकांची यादी आहे, त्यात यादीत शेळके यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे, असे खात्रीलायक वृत्त आहे. पण, अधिकाधिक संचालक बिनविरोध निवडून आणताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही राजकीय तडजोडी केल्या आहेत.
त्यातून मुरकुटे यांचे नाव पुढे आले आहे. मात्र त्याला श्रेष्ठी किती महत्त्व देतात, यारच बरेच काही अवलंबून आहे. उपाध्यक्षपदासाठी संगमनेरचे माधवराव कानवडे यांच्या नावाची चर्चा आहे. महसूलमंत्री थोरात हे कुणाच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.