हनुमान टाकळीत शाळेची उत्साही वातावरणात दिंडी साजरी; विठ्ठल नामाचा गजर
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथे जिल्हा परीषद प्राथमिक शाळेची
बाल चिमुकल्यांच्या खांद्यावर पताका, गळ्यात मृदुंग_विणा ,टाळ, कपाळाला टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाने हरीनाम म्हणत दिंडी हनुमान मंदिराला व गावातून प्रदक्षिणा घालून उत्साही वातावरणात साजरी झाली.विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, वारकरी आदिंची वेशभूषा केली होती.कालच पाऊस पडून गेल्यामुळे रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यात पाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.तरीही विद्यार्थी हरिनाम व गाणे गात तसेच फुगडी खेळत आणि झाडें लावा,झाडे जगवा असा पर्यावरणाचा संदेश देत तसेच " विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी राम विठ्ठला "असा जयघोष करीत दिंडीचा मनमुरादपणे आनंद लुटत होती.या बाल वारक-यांचा आनंद व्दिगुणित व्हावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते अभिजित ( बच्चू ) दगडखैर , रावसाहेब कर्डीले यांनी या सर्व विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करून चाॅकलेट दिले.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला बिसलेरी पाण्याचे वाटप बच्चू दगडखैर यांनी केले आणि बाल चमू तृप्त झाले.याबरोबरच महमंद सय्यद या युवकाने सर्व मुलांसाठी पोहेंचं उत्तम नियोजन केले होते.
या नेत्रदीपक सोहळ्यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन हनुमान टाकळी करांना नक्कीच झाले.यावेळी मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी गर्दी करून शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. बालवारकरी सोबत गाव फुगडीचा व हरिनामाचा आनंद लुटला.
हा सोहळा यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक संभाजी बेरड,सह शिक्षक संभाजी पठाडे, बाळासाहेब सरगड, सुधाकर शेटे, उषाताई मरकड ,सुनिताताई गुंजाळ, रेखाताई म्हस्के आदींनी परिश्रम घेतले.