महाराष्ट्र
1276
10
वंचित तरुणांनो, प्रस्थापितांची मक्तेदारी संपवा- प्रा. किसन चव्हाण
By Admin
वंचित तरुणांनो, प्रस्थापितांची मक्तेदारी संपवा- प्रा. किसन चव्हाण
अकोला येथे वंचितांची घोंगडी बैठक उत्साहात
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील प्रस्थापित कारखानदाराची राजधानी समजल्या जाणाऱ्या अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांची घोंगडी बैठक आणि शाखा उद्घाटन मोठ्या थाटा - माटात संपन्न झाले.
गावातील ग्रामस्थांनी तोफा, फटाके वाजवून प्रा. किसन चव्हाण व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांची मिरवणूक काढली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करतांना प्रा. किसन चव्हाण यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये प्रस्थापितांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले,आता सर्व सामान्य तरुणांच्या हातात सत्ता द्या.तालुक्यातील प्रस्थापितांची गावा गावात घराणेशाही पोसली आहे आणि तीच घराणी गावातील वर्षानुवर्षे सत्ता भोगत आहे.आजोबा नंतर बाप, नंतर मुलगा, नंतर नातू, नंतर सुन असे सत्तेचे चक्र तालुक्यातील प्रस्थापितांप्रमाणेच गावो गावो चालू आहे.प्रस्थापित कारखानदार आपल्या बागलबच्चनाची लायकी नसतांनाही सत्ता देतात असे किती दिवस चालणार ,गावागावातील सर्व जाती धर्मातील वंचित तरुणांनो,ही मक्तेदारी संपवा. येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच विधानसभा, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला निवडून द्या. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार गरीब असेल परंतु तो स्वाभिमानी ,तळमळीचा, जनतेच्या सेवेसाठी तत्पर असेल,या मतदारसंघाची ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी काय दिवे लावले. वर्षानुवर्षे सत्ता भोगूनही तरुणांच्या हाताला शाश्वत रोजगार देण्यास ते अपयशी ठरले. निवडणूकीत जात म्हणून मते मागायची आणि नंतर जातीचीच माती करायची, हा एकमेव कार्यक्रम या मतदारसंघातील तिन्ही कारखानदारांनी केला आहे. येणाऱ्या निवडणूकीत या सत्तापिपासू कारखानदारांना सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय शेवगाव पाथर्डीचा चेहरा बदलणार नाही.
यावेळी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के,पाथर्डी तालुका अध्यक्ष रविंद्र म्हस्के,प्यारेलाल शेख, भारत गोसावी,संजय कांबळे, राष्ट्रवादीचे बंटीभाऊ गर्जे,पंचायत समितीचे सदस्य आणि आपचे नेते सुभाष केकान, सरपंच अरुण गिरी, आकाश दौंडे यांची मनोगते झाली.
याप्रसंगी अकोलाचे सरपंच सुभाष गर्जे , सुभाष केकान यांनी भारतीय संविधानची प्रत देऊन प्रा. किसन चव्हाण यांचे गावाच्या प्रवेशद्वारावरच स्वागत केले.
कार्यक्रमास दिलावर बागवान,सोपान भिंगारे, सुनिल जाधव, राजुसेठ पठाण, सुनिता जाधव,आनिताताई कांबळे,आंबिकाताई कोकणे,बाळासाहेब गोसावी,अरुण थोरात,सुरेश जाधव,विष्णू गिरी,गणेश गिरी ,चांदभाई शेख,अशोक बिडे,धोंडीराम मासाळ, विकास साळवे,जगदीश कांबळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घोंगडी बैठकीचे सुत्रसंचालन सुखदेव मर्दाने यांनी केले तर शाखा अध्यक्ष सुनिल गिरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
Tags :

